Rohit Shetty Sakal
मनोरंजन

Rohit Shetty Birthday: रोहित शेट्टी कधीकाळी अभिनेत्रींच्या कपड्यांना करायचा इस्त्री, असा बनला सिनेमाचा अ‍ॅक्शन किंग

अनेक दमदार बॉलिवूड चित्रपट देणाऱ्या रोहित शेट्टीचा एक यशस्वी चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक होण्याचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमधील अ‍ॅक्शनपट म्हटले की, जो चेहरा डोळ्यांसमोर येतो, तो म्हणजे रोहित शेट्टी. हवेत उडत्या गाड्या आणि वेगवेगळे स्टंट हे रोहित शेट्टीच्या चित्रपटाचे विशेष आकर्षण असते. अनेक दमदार बॉलिवूड चित्रपट देणाऱ्या रोहित शेट्टीचा एक यशस्वी चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक होण्याचा हा प्रवास सोपा नव्हता.

त्याने या ठिकाणी पोहचण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. रोहित शेट्टी आज म्हणजेच १४ मार्च रोजी त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. तुम्हाला माहित आहे का आजच्या जमान्यात करोडोंमध्ये खेळणारा रोहित शेट्टी अभिनेत्रींच्या साड्या प्रेस करायचा.

बॉलीवूडचा उत्तम दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शेट्टीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. 14 मार्च 1974 रोजी मुंबईत जन्मलेल्या रोहित शेट्टीने आतापर्यंत 'सिम्बा', 'सूर्यवंशी', 'सिंघम', 'चेन्नई एक्सप्रेस'सह अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

चित्रपट जगत आणि रोहित शेट्टी यांचे लहानपणापासून नाते होते. त्याची आई रत्ना शेट्टी बॉलीवूडमधील ज्युनियर आर्टिस्ट होत्या, तर वडील एमबी शेट्टी स्टंटमॅन होते. रोहित पाच वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर घरची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने त्याला लहान वयातच काम करावे लागले.

रोहित शेट्टीने 2003 साली 'जमीन' चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. होते. यानंतर त्याने 'गोलमाल' बनवला, ज्याने त्याचे नशीब उजळले. पुढे 'चेन्नई एक्सप्रेस', 'सिंघम' आणि 'बोल बच्चन' सारखे चित्रपट करून रोहित शेट्टीला अॅक्शन किंग म्हटले जाऊ लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : नंदुरबार नगरपरिषद निकाल आज; 470 उमेदवारांचे भवितव्य ठरेल स्पष्ट

Indian travelers in USA: भारतीय प्रवासी अमेरिकेत किती दिवस राहू शकतात? दूतावासाने जारी केल्या सूचना ; व्हिसावर अवलंबून नाही

Pune Cyber Crime: सायबर फसवणुकीतून कोटींची लूट; शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल

Pune Cold Weather: पुण्यात पुन्हा थंडीचा कडाका; किमान तापमान ८.१ अंशांवर, पहाटे गारठा

Maharashtra Cold Wave: : राज्यात पुन्हा थंडीची लाट, हुडहुडी वाढली; आज दिवसभरात कसे असेल हवामान? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT