Ram Kadam on Pathan Movie esakal
मनोरंजन

Pathan Movie : हिंदुत्वचा अपमान करणारी कोणतीच 'फिल्म' चालू देणार नाही; 'पठाण' वादावर राम कदमांचा थेट इशारा

पठाण चित्रपटाला देशभरातील साधू-संतांसह सोशल मीडियावर विरोध होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

पठाण चित्रपटाला देशभरातील साधू-संतांसह सोशल मीडियावर विरोध होत आहे.

Ram Kadam on Pathan Movie : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण चित्रपटातील (Pathan Movies) 'बेशरम रंग' या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या वादात आता भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी एन्ट्री केलीय.

पठाण चित्रपटाला देशभरातील साधू-संतांसह सोशल मीडियावर विरोध होत आहे. अनेक हिंदू संघटना या चित्रपटाला विरोध करताना दिसत आहेत. महाराष्ट्रातही सध्या हिंदुत्व विचारधारा असणारं सरकार आहे, त्यामुळं चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांनी समोर येऊन त्यांची बाजू स्पष्ट करावी, असं आवाहन राम कदम यांनी ट्विटच्या माध्यमातून केलंय.

साधू-संतानी जे आक्षेप घेतलेत, त्यावर त्यांचं (निर्माता-दिग्दर्शक) काय म्हणणं आहे हे जनतेसमोर स्पष्ट करावं. महाराष्ट्रच्या भूमीवर हिंदुत्वचा अपमान करणारी कोणतीही 'फिल्म' अथवा सिरीयल चालू देणार नाही आणि ती खपवूनही घेतली जाणार नाही, असा कडक इशारा राम कदम यांनी दिला आहे.

पठाण चित्रपटावर शाहरूख खानची काय भूमिका?

कोलकाता इथं पार पडलेल्या 28 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेता शाहरूख खान यावर प्रतिक्रिया देताना म्हणाला, काही लोक सोशल मीडियावर नकारात्मकता पसरवत आहेत. सिनेमा हे समाज बदलण्याचं माध्यम आहे. तसंच, जग काहीही करो. मी, तुम्ही आणि सकारात्मक लोक अजून जिवंत आहेत, असं वक्तव्य शाहरूख खाननं केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: सीएसएमटी-गोरेगाव लोकल ४५ दिवस बंद? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, नेमके कारण काय?

Miraj Panchayat Samiti : मिरज पंचायत समितीच्या इमारतीवर डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा फलक; अधिकारी गैरहजर अन् पोलिसांसमोरच चिटकवली अक्षरे, नामकरणावरून गोंधळ सुरु

Numerology: लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे असतात 'या' ३ जन्मतारखा असलेले लोक; करिअरमध्ये मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वंचितांचा आवाज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Solapur Road Accident: एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; बस चालकासह एका प्रवाशी महिलाचा मृत्यू ; दहा जण जखमी

SCROLL FOR NEXT