BJP MP Manoj Tiwari Akshara Singh Praised Ram Mandir esakal
मनोरंजन

Manoj Tiwari : 'अब सिर्फ रामजी की फिल्म चलेगी'! मनोज तिवारी असं का बोलून गेले?

बीजेपीचे खासदार, अभिनेते आणि गायक मनोज तिवारी हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच चर्चेत असतात.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

BJP MP Manoj Tiwari Akshara Singh Praised Ram Mandir : बीजेपीचे खासदार, अभिनेते आणि गायक मनोज तिवारी हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच चर्चेत असतात. आपल्या परखड मतांसाठी चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या मनोज (Manoj Tiwari Latest News) तिवारींचा भोजपूरी चित्रपटांमधील दबदबा मोठा आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

मनोज तिवारी यांनी आज तकच्या साहित्य तकमध्ये केलेलं वक्तव्य हे अनेकांच्या प्रतिक्रियेचा (Bhojpuri Singer Manoj Tiwari Interview) विषय आहे. यावेळी त्यांनी व्यासपीठावरुन राम भजन गात चाहत्यांची वाहवा मिळवली. यावेळी भोजपूरी गायिका अक्षरा सिंहने त्यांना साथ संगत करत त्या सोहळ्याची रंगत आणखी वाढवली. मनोज यांनी राम मंदिर, राम मंदिराची निर्मिती आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अयोध्येतील राम मंदिराविषयी आपण प्रचंड उत्सुक असल्याचे मनोज यांनी म्हटले आहे. साहित्य आजतक २०२४ मध्ये राजकीय नेते, संगीत, अभिनय विश्वातील विविध मान्यवर उपस्थित असल्याचे दिसून आले आहे. त्यात मनोज तिवारी यांच्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. याप्रसंगी मनोज तिवारी यांनी अक्षराच्या गायकीची स्तुती केली आहे. तसेच राम मंदिरासाठी पीएम मोदी यांनी धन्यवाद दिले आहे.

मला कधीही वाटले नव्हते की, अयोध्येमध्ये राम मंदिराची निर्मिती इतक्या मोठ्या प्रमाणात केली जाईल. आता ते शक्य झाले आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी बाकी काही नाही फक्त राम चित्रपट सुरु असेल. 'अब सिर्फ राम की फिल्म चलेगी' अशा शब्दांत तिवारी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तिवारी यांचे बिहार के लाला नावाचे गाणे गेल्या काही दिवसांपासून ट्रेडिंग असल्याचे दिसून आले. वो हे राम नावाचे गाणे सोशल मीडियावर ट्रेंड करत असल्याचे तिवारी यांनी यावेळी सांगितले. ही सगळी रामाची कृपा आहे असे तिवारी यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Card e-KYC: रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता घरबसल्या करता येणार ई-केवायसी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

IND vs NZ 2nd T20: भारत न्यूझीलंडचा दुसरा टी-२० सामना कधी अन् कुठे पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : 'हा' तर शिंदेंना गोत्यात आणण्याचा डाव; गुलाबराव पाटीलांनी केली ऑडिओ क्लिपच्या SIT चौकशीची मागणी

Farmer Loan Waiver : कर्जमाफीची चौथी यादी जाहीर; पुण्यातील १६ हजार २४६ शेतकऱ्यांचा समावेश

Neha Bora: 'CJPच्या आंदोलनाशी माझा संबंध नाही'; नेहा बोरा यांचा दिल्ली उच्च न्यायालयात दावा, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT