Bloody Daddy Trailer out: Esakal
मनोरंजन

'वन हेल ऑफ अ ब्लडी नाईट!' कोकेननं भरलेली बॅग अन् 'त्या' रात्रीचा खेळ..म्हणजेच शाहिदचा Bloody Daddy

Vaishali Patil

Bloody Daddy Trailer out: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा अनेकांचा लाडका अभिनेता आहे. त्याची क्रेझ ही आजही कायम आहे. तो अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय असतो. शाहिदने नुकतचं 'फर्जी' या वेब सीरिजमधुन ओटीटीवर पदार्पण केले.

त्याची फर्जी चाहत्याना खुपच आवडली. त्यानंतर आता शाहिद आता पुन्हा चाहत्यांच मनोरजंन करण्यासाठी सज्ज आहे. शाहिद आता त्याच्या आगामी 'ब्लडी डॅडी' या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे.

अलीकडेच शाहिदने 'ब्लडी डॅडी' चित्रपटाचे आणखी एक पोस्टर शेअर केलं होतं. त्यानंतर आता ब्लडी डॅडीचं ट्रेलरही रिलिज करण्यात आलं आहे. हे ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली असून ते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

शाहिद कपूरने सोशल मीडियावर ब्लडी डॅडीचा ट्रेलर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, 'ए हेल ऑफ ए ब्लडी नाईट... ट्रेलर आऊट. #BloodyDaddyOnJioCinema'. 'ब्लडी डॅडी'मध्ये भरपूर अॅक्शन आणि भरपूर स्टंट यांचा मसाला पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर कळते की हा सगळा खेळ एका कोकेनने भरलेल्या बॅगसाठी खेळला जात आहे. हा चित्रपट पुर्णपणे अॅक्शन सीन्सने भरलेला आहे.

यात शाहिद कपूर एका भयानक आणि रफ-अँड-टफ भूमिकेत दिसत आहे. त्याचबरोबर संजय कपूर आणि रोनित रॉय यांच्या भुमिकाही खुपच प्रभावित करणाऱ्या आहेत.

अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात शाहिद सोबतच संजय कपूर, डायना पेंटी आणि रोनित रॉय आणि राजीव खंडेलवाल यांच्याही भूमिका आहेत.

शाहिदचा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. 9 जून 2023 रोजी Jio सिनेमावर तो पाहता येणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर शाहिदचे चाहते हा सिनेमा पाहण्यासाठी खुपच उत्सूक असून आताच ट्विटवर #BloodyDaddy ट्रेंड होत आहे.

शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, शाहिद कपूर शेवटचा राज आणि डीकेच्या क्राईम थ्रिलर सिरिज 'फर्जी' मध्ये दिसला होता. 

यापूर्वी त्याने 'जर्सी' या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात काम केले होते, ज्यामध्ये त्याने क्रिकेटरची भूमिका केली होती. 

शाहिद कपूर 'उडता पंजाब', 'हैदर', 'जब वी मेट', 'पद्मावत' आणि 'इश्क विश्क' सारख्या अनेक चित्रपटांमधील अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT