Animal Bobby Role  esakal
मनोरंजन

Animal Bobby Role : बॉबी साकारतोय आतापर्यतची सगळ्यात खतरनाक भूमिका, ज्यात चक्क तो....! 'अ‍ॅनिमल' मधील सिक्रेट आलं समोर

प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डीच्या अॅनिमलचा टीझर समोर आल्यानंतर चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले होते.

युगंधर ताजणे

Animal Actor Bobby Deol - प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डीच्या अॅनिमलचा टीझर समोर आल्यानंतर चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. त्याचे कारण त्यातून समोर आलेला रणबीर आणि बॉबी देओलचा लूक. त्यांच्या कातील लूकनं चाहत्यांना भलतेच खूश केले होते. पण यासगळ्यात चर्चा रंगली ती बॉबीच्या लूकची.

बॉबीनं जो लूक दिला त्यावरुन त्याचे चाहते फिदा झाले आहेत. यापूर्वी प्रकाश झा दिग्दर्शित आश्रम नावाच्या मालिकेतमध्ये बॉबीनं बाबाजींची भूमिका साकारली होती. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता अॅनिमलमधून वेगळ्या भूमिकेला सामोरा जाताना दिसतो आहे.

Also Read - Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

काय सांगता बॉबी नरभक्षकाच्या भूमिकेत?

बॉबीच्या वाट्याला अॅनिमलमध्ये जी भूमिका आली आहे त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यात तो नेमकी कोणती भूमिका साकारणार याविषयी वेगवेगळ्या चर्चा होत्या. पण आता बॉबीच्या भूमिकेविषयी उत्तर मिळालं आहे. तो पहिल्यांदाच इतक्या भयानक भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

बॉबीनं जागरणच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला होता. तिथे त्याला त्याच्या आगामी चित्रपटाच्या भूमिकेवरुन विचारणा करण्यात आली होती. यावेळी त्यानं ज्या गोष्टींविषयी वाच्यता केली त्यावरुन त्याची त्या चित्रपटामध्ये असणारी भूमिका नरभक्षी असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहे. बॉबीच्या या चित्रपटाविषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.

बॉबीनं अॅनिमल मधील टीझरविषयी म्हटले आहे की, मला त्या भूमिकेवरुन जो काही प्रतिसाद मिळतो आहे तो मिळेल असे कधीही वाटले नव्हते. मी जेव्हा तो सीन पूर्ण केला तेव्हा मॉनिटरमध्ये पाहिले पण नव्हते. आम्हाला काही करुन तो सीन संपवायचा होता. मी तो सीन जेव्हा टीझर प्रदर्शित झाला तेव्हाच पाहिला होता. या सीनमध्ये मी आहे का, काय सांगता, अशी माझी पहिली प्रतिक्रिया होती.

लोकांना काही करुन मी कोणती भूमिका साकारत आहे याविषयी कमालीची उत्सुकता आहे. माझी भूमिका काय आहे हे लगेचच मला तुम्हाला सांगता येणार नाही. पण एक नक्की की, मी यापूर्वी कधीही अशाप्रकारची भूमिका केलेली नाही. मला पहिल्यांदाच अशा प्रकारची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळते आहे. माझा अवतार खूपच भयानक असून त्यात नरभक्षींचा समावेश आहे. अशा शब्दांत बॉबीनं त्याची भावना व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात आला छोटा डॉन

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

BBM 6 UPDATE:'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्रीची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का

SCROLL FOR NEXT