bobby deol look in kanguva movie udhiran suriya pan india film  SAKAL
मनोरंजन

Bobby Deol Kanguva: वाढदिवशी चाहत्यांना गिफ्ट! बॉबीचा 'कंगुवा'मधील जबरदस्त लूक रिलीज

बॉबी देओलचा कंगुवामधील लूक शेअर करण्यात आलाय

Devendra Jadhav

Bobby Deol Kanguva News: बॉबी देओलने २०२३ मध्ये 'ॲनिमल' सिनेमातून लोकांचं मनोरंजन केलं. बॉबीने अबरारची खलनायकी भूमिका साकारून सर्वांच्या मनावर राज्य केलं. आज बॉबी देओलचा वाढदिवस.

बॉबीच्या वाढदिवसानिमित्त साऊथमधील बहुप्रतिक्षित 'कंगुवा' सिनेमाच्या टिमने त्याचा सिनेमातील लूक शेअर केलाय.

अभिनेता सुरिया त्याचा पुढील तामिळ चित्रपट 'कंगुवा'साठी सज्ज झाला आहे. शनिवारी, 27 जानेवारी रोजी सोशल मीडियावर चित्रपटातील खलनायकी भूमिकेत असलेला अभिनेता बॉबी देओलचा लूक शेअर करण्यात आलाय. बॉबी सिनेमात उधीरन ही भूमिका साकरणार आहे,

बॉबीचा लूक शेअर करताच पोस्टमध्ये लिहिले आहे की, "निर्दयी. शक्तिशाली. अविस्मरणीय. आमचा #उधीरन, #लॉर्ड बॉबी सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा."

सिवा दिग्दर्शित कंगुवा या चित्रपटात सुरिया, दिशा पटानी, नटराजन सुब्रमण्यम, जगपती बाबू, योगी बाबू, रेडिन किंग्सले, कोवई सरला इत्यादी लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत.

चित्रपटाचे संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिले आहे आणि निर्मात्यांनी याआधीच चित्रपटातील एक टिझर आणि पोस्टर शेअर केलंय. ज्यात चित्रपटातील सुरियाचा अंगावर काटा आणणारा लूक दिसून येतो.

'कंगुवा' चित्रपट 1500 वर्षांपूर्वीच्या काळात सेट केला गेला आहे. या सिनेमात संपूर्ण भारतातील भिन्न संस्कृती दर्शविणारे घटक दिसणार आहेत. शिवाय काल्पनिक कथांमध्ये प्राचीन तमिळ संस्कृतीशी संबंधित अनेक संदर्भ आणि तथ्ये पाहायला मिळणार आहेत.

हा चित्रपट 2024 च्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय कंगुवा 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये 3D मध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटातून दिशा पटानी आणि बॉबी देओल साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT