Viral Photo news  esakal
मनोरंजन

Viral Photo: धर्मेंद्र यांची पहिली पत्नी सोशल मीडियावर!

बॉबी देओलची आई आणि प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर या फारशा लाईमलाईटमध्ये नसतात. त्यांच्याविषयी चाहत्यांना माहिती नाही.

युगंधर ताजणे

Bobby Deol News: बॉबी देओलची आई आणि प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर या फारशा लाईमलाईटमध्ये नसतात. त्यांच्याविषयी चाहत्यांना माहिती नाही. सध्या सोशल मीडियावर त्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. बऱ्याच (Bollywood Actor Dharmendra) कालावधीनंतर त्यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे. धर्मेंद्र यांनी पहिले लग्न प्रकाश कौर यांच्याशी केले होते. त्यांना दोन मुलं आणि दोन मुली आहेत. त्यांची (entertainment news) नावं सनी आणि बॉबी असं आहे. तर मुलींची नावं अजीता, विजेता अशी आहे. दुसरं लग्न त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी केलं.

धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नाही. धर्मेंद्र हे हेमा मालिनी यांच्यासोबत नेहमीच फोटो शेयर करत असतात. मात्र त्यांनी पहिल्या पत्नीचा फोटो शेयर केल्याचे कधीही दिसलं नाही. सध्या बॉबी देओलनं एक फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये तो त्याच्या आईसोबत असल्याचे दिसत आहे. त्या फोटोंवर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.

बॉबीनं 1995 मध्ये बरसात नावाच्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यातील गाणीही लोकप्रिय झाली होती. करिअरच्या सुरुवातीच्या काळात बॉबीनं अनेक हिट चित्रपट दिले. काजोल, मनीषा कोईराला यांच्यासोबतच्या बॉबीच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी दाद दिली. बॉबी शेवटी लव होस्टलमध्ये दिसला होता. त्याच्यासमवेत सान्या मल्होत्रा आणि विक्रांत मैसी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यासगळ्यात बॉबीच्या आश्रम मालिकेनं मात्र लोकप्रियताचा कळस केला. त्याच्या दोन्ही सीझनला तुफान प्रतिसाद मिळाला.

बॉबी देओलच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, त्याच्याकडे तीन चित्रपट आहेत. त्यात पेंटहाऊस, अपने 2 आणि अॅनिमल या चित्रपटांचा समावेश आहे. त्याची चाहत्यांना गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता आहे. काही महिन्यांपूर्वी बॉबीची आश्रम नावाची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यामुळे त्याची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. बॉबीला आजवर जेवढी लोकप्रियता मिळाली नाही तेवढी एकट्या आश्रमनं दिल्याचे दिसून आले. प्रकाश झा यांनी त्या मालिकेचे दिग्दर्शन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT