Moving in With Malaika Esakal
मनोरंजन

Moving in With Malaika: खबरदार! मला कुणी ट्रोल केलं तर..

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमध्ये अनेक हॉट ब्यूटी आहेत. मात्र त्यात मलायका अरोराला काही तोडच नाही. मलायका नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या चित्रपटांमुळे कमी तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जरा जास्तच चर्चेत असते. ती फिटनेस फ्रिक असल्याबरोबरचं फॅशनच्या बाबतीतही चांगलीच कमाल आहे.(bolllywood actress Malaika Arora debut web show)

ती अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. ती कूठेही गेली तरी पापाराझी तिला कॅमेऱ्यात कैद करतात. खरं तर अनेक वेळा हे व्हिडिओ पाहून लोक तिला ट्रोलही करतात. मग त्यात तिचा फॅशन सेन्स असो किंवा तिची दिनचर्या, सोशल मीडिया यूजर्स तिला टार्गेट करतात. अनेक वेळा मलायका या ट्रोलिंगवर जास्त लक्ष देत नाही. मात्र तर आता मलायका अरोरा या सोशल मीडिया ट्रोलिंगवर उघडपणे बोलली आहे.

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

 प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मलायका म्हणाली, 'माझा ड्रेसिंग सेन्स, चालण्याची पद्धत असो, माझं वय, माझी लव लाइफ किंवा माझे पूर्वीचे नाते असो, प्रत्येक गोष्टीसाठी मला ट्रोल केलं जातं. दैनंदिन जीवनात मी काहीही करत असली तरी प्रत्येक परिस्थितीत मला ट्रोल केलं जातं. मलायकाला जेव्हा विचारण्यात आले की ती ट्रोलिंगला कशी सामोरे जाते? तर तिला स्पष्टपणे म्हणाली, 'मला ट्रोलिंगची पर्वा नाही. आता ट्रोलिंग हा माझ्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. पण या ट्रोलिंगमुळे माझ्या जवळच्या लोकांना त्रास झाला आहे.'

याबद्दल बोलतांना ती पुढे म्हणाली, ‘मलाही सुरुवातीला ट्रोलिंगचा त्रास व्हायचा. मला माझ्या क्षमतेबद्दल शंकाही व्हायची, पण आता तसं नाही. आता मला समजलंय की मी कोणत्याही माणसाची मानसिकता किंवा विचार बदलू शकत नाही. जे माझ्या जवळचे आहे ते मला चांगल्याप्रकारे ओळखतात आणि ते माझ्यासाठी पुरेसं आहे.' (Now Malaika speak about about social media trolling)

मलायका पुढे म्हणते, 'आता मी ट्रोल्सना उत्तर देण्यासाठी 'मूव्हिंग इन विथ मलायका' नावाचा शो घेऊन येत आहे. या शोच्या माध्यमातून मी ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणार आहे. मलायकाच्या याशोचे OTT अॅप डिस्ने प्लस हॉटस्टारवर 5 डिसेंबरपासून ऑनलाइन स्ट्रीमिंग करण्यात आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर मलायका बऱ्याच दिवसांनंतर आयुष्मान खुरानाच्या 'अ‍ॅन अॅक्शन हिरो' या चित्रपटात आयटम साँग करताना दिसणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20I Rankings: वरूण चक्रवर्थीने मोडला पाकिस्तानी गोलंदाजाचा विक्रम; आता टार्गेटवर शाहिद आफ्रिदी...

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

Leopard Attack : बिबट्यापुढे धाडसी मातेचे शौर्य ठरले व्यर्थ; डोळ्यांदेखत पोटच्या गोळ्याला नेले फरपटत; हंबरड्याने पाणावले उपस्थितांचे डोळे

एपस्टिन फाइलमध्ये आहे तरी काय? भारतासह जगभरातील नेते अन् उद्योगपतींनी घेतलाय धसका

Latest Marathi News Live Update : पुण्यातील ड्रग्स तस्करने घरातच उभारली प्रयोगशाळा

SCROLL FOR NEXT