Aamir Khan esakal
मनोरंजन

Aamir Khan Controversy: मिस्टर परफेक्शनिस्टचं अन् वादाचं नात त्यांच्या लव्ह लाइफ पेक्षा घट्ट!

सकाळ डिजिटल टीम

अमिर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जात असलं तरी त्याचं वागणं नेटकऱ्यांना पटत नाही. सध्या आमिर आणि त्याची एक्स वाईफ किरण रावसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोंमध्ये आमिरला पाहून अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर यातून नवा वाद तयार होण्याची शक्याताही निर्माण झाली आहे. मात्र याआधीही त्यांचं नाव अनेक वादात आलं आहे. त्यावर आता एक नजर टाकूया.

असहिष्णुता वाद

आमिर खानने असहिष्णुतेबद्दल सांगितले होतं की, त्याची पत्नी भारतात राहण्यास घाबरते. हे विधान आल्यावर आमिर खानला प्रचंड विरोधाला सामोरं जावं लागलं. आमिरच्या या वक्तव्यावर अनुपम खेर आणि परेश रावल यांसारख्या बड्या अभिनेत्यांनी टीका केली होती. अनेक दिवस हे प्रकरण तापले होतं.

अमीरच्या कुत्र्यांचं नाव 'शाहरुख'

आमिर खानने आपल्या कुत्र्याचे नाव 'शाहरुख' ठेवले आहे. हे जेव्हा कळालं त्यानंतर यावर बराचं वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्यानंतर आमिरला सोशल मीडियावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. यानंतरच शाहरुख आणि आमिरमधील शीतयुद्ध वाढलं होतं.

अमिताभ बच्चन यांच्यावर वक्तव्य

2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी स्टारर चित्रपट 'ब्लॅक' बाबत आमिर खानने अतिशय वादग्रस्त विधान केले होते. अमिताभ बच्चन यांची भूमिका डोक्यावरून गेल्याचं वक्तव्य आमिरनं केलं. या विधानामुळे त्यांच्यावर चांगलीच टीका झाली होती, त्याचवेळी प्रसारमाध्यमांमध्ये अमिताभ बच्चन आणि आमीरच्या मतभेदाच्या बातम्या आल्या होत्या.

मुलीसोबतच्या फोटोवर ट्रोल

आमिरने त्याची मुलगी इरा खानसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. अनेक यूजर्सनी या फोटोवर अश्लील कमेंट केली होती. फोटोमध्ये इरा पापा आमिरच्या वर बसून मस्ती करताना दिसली. या फोटोवर जबरदस्त ट्रोलिग झालं होत. त्याच्या या फोटोवर लोकांनी अश्लील कमेंटही केल्या होत्या.

भावाशी भांडण

आमिर खानचा भाऊ फैसल खान याने आमिर खानवर पैशाच्या व्यवहारावरून अपमान आणि मारहाण केल्याचा आरोप केला होता. माझी ही परिस्थिती आमिर खानमुळे झाली आहे असंही त्यांन सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागातील बारा प्रमुख रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT