Aamir khan 
मनोरंजन

मुलाखतीत आमिरने पहिल्या पत्नीबद्दल केला खुलासा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखला जाणारा कलाकार म्हणजे आमिर खान. राख, हम है राही प्यार के, राजा हिंदूस्थानी, दिल, लगान, दिल चाहता है, फना, रंग दे बसंती, गजनी, तारे जमिन पर, 3 इडियट्स, धूम 3, पिके या हिट चित्रपटांमधून आमिर प्रेक्षकांच्या भेटीस आला. आमिर खान त्याच्या अभिनयासह सामाजिक कामासाठीसुद्धा ओळखला जातो. आमिरने मीडियापासून लपवून रीना दत्ता सोबत लग्न केले होते. रिना आणि आमिरला ईरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. लग्नाच्या 16 वर्षा नंतर आमिर आणि रिनाचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2002 साली त्याने किरण राव सोबत लग्न केले. दोघांना आजाद नावाचा मुलगा आहे. घटस्फोटानंतर देखील आमिर आणि रिना चांगले मित्र आहेत. 

एका मुलाखतीत लग्नाबद्दल बोलताना आमिर खान म्हणाला,'रिनासोबत मी जेव्हा लग्न केले जेव्हा आम्ही दोघेही खूप लहान होतो. आम्ही सोबत 16 वर्षे राहिलो. त्यानंतर जेव्हा आपापले मार्ग वेगळे होईपर्यंत वाद पोहोचले तेव्हा आम्हा दोघांना तसेच कुटुंबालाही धक्का बसला. या टप्प्यातून सावरण्यास जवळपास दोन वर्षे लागली. रिनाने आयुष्याची बरीच वर्षे माझ्याबरोबर घालविली आणि मला जीवनात सोबत राहण्याची संधी दिली याबद्दल तिचा मी आभारी आहे. रिना ही कुटुंबाचा एक महत्वाचा भाग आहे आणि कायम राहील. आम्ही कायदेशीररित्या विभक्त झालो आहोत पण कागदाचा एक तुकडा आमच्यातील नातं संपवू शकत नाही.'

रिनापासून विभक्त झाल्यानंतर किरण रावशी लग्नगाठ बांधली. पण या लग्नाचा त्याच्या आणि त्याच्या पहिल्या पत्नीच्या नात्यावर काहीही फरक पडला नाही. उलट रिना आणि किरणमध्येही खूप चांगली मैत्री आहे. याबद्दल बोलताना आमिरने मुलाखतीत सांगितले होते की, 'आपल्या माजी आणि वर्तमानातील पत्नीच्या मैत्रीपूर्ण नात्यात आपले कोणतेही योगदान नाही.रिनापासून विभक्त झालो असलो तरीही यामुळे दोघांमधील नातं काही संपत नाही.'
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT