मनोरंजन

'माझ्या वडिलांबद्दल...', अभिषेक नेटकऱ्यावर भडकला

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे नेहमी त्यांच्या वेगळेपणासाठी चर्चेत असतात.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे नेहमी त्यांच्या वेगळेपणासाठी चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून ते सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. सध्या त्यांचा एक व्हिड़िओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका चाहत्यानं अमिताभ यांचे नाव आणि त्यांच्याबद्दल वेगळी प्रतिक्रिया दिल्यानं अभिषेक ( Abhishek Bachchan) नाराज झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अनेकांनी अभिषेकला सपोर्टही केला आहे. अमिताभ (Amitabh Bachchan) यांनी अभिषेकच्या बॉब विश्वासबद्दल व्टिटरवर कमेंट केली होती. त्यामुळे ते चर्चेत आले होते.

त्या पोस्टमध्ये अभिषेकचं एक कार्टूनही त्यांनी शेयर केलं होतं. यावेळी एका युझर्सनं बच्चन यांच्या त्या व्टिटला एक प्रतिक्रिया दिली. मात्र त्या प्रतिक्रियेमध्ये त्यानं बच्चन यांच्या नावाचे स्पेलिंग चुकवले आहे. त्यामुळे त्या व्टिटवर अभिषेकनं नाराजी व्यक्त केली आहे. त्यावेळी त्यानं त्या युझर्सला बच्चन या नावाची बरोबर स्पेलिंग काय आहे हे विचारलं आणि त्याने ती चूक दुरुस्त करुन दिली आहे. व्टिटर युझरनं अभिषेकचं कार्टून शेय़र केलं आहे. त्याला कॅप्शन देताना त्यानं लिहिलं आहे की, बॉब बिस्वास पाहिल्यानंतर मी स्वताला प्रतिक्रिया देण्यापासून थांबवू शकलो नाही. आता माझ्या पिढीचे आघाडीचे कलाकार अभिषेक बच्चन यांच्यासाठी मी कार्टून तयार केले आहे. असे लिहिताना त्या युझर्सनं अभिषेकला ते कार्टून टॅगही केलं आहे. त्यावेळी त्यानं नाव लिहिताना बच्चन यांचे नाव चुकवले आहे.

वास्तविक त्या युझर्सनं अभिषेक बच्चन यांचे नाव बरोबर लिहिले होते. मात्र आपल्या आर्टमध्ये ते नाव 'Abhishek Bacchan' असे लिहिले होते. यावेळी त्यानं ती पोस्ट अमिताभ बच्चन यांना देखील टॅग केली होती. जेव्हा अमिताभ यांनी ते व्टिट पाहिले तेव्हा त्यांनी त्या युझर्सला आपली चूक लक्षात आणून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गडचिरोलीत पुन्हा माओवादी हालचालींची चाहूल? कुंडमजवळ बॅनर-पत्रके आढळली; नेमकं काय लिहिलंय?

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला अचानक का डच्चू? श्रेयस अय्यरने सांगितलं खरं कारण; संजूची एन्ट्रीही ठरली निष्फळ

Latest Marathi News Update: अनोळखी व्यक्तीच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून

Women Empowerment Drive: आषाढी वारीत ‘महिला उन्नती वारी २०२६’ला उरुळी कांचनमध्ये सुरुवात; महिला सक्षमीकरण, सुरक्षा व हक्कांबाबत व्यापक जनजागृती

Pune Incidents: पुणे-सातारा रस्त्यावर उड्डाणपुलाखाली फिरस्त्याचा सिमेंट गट्टूने खून; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT