actor anil kapoor
actor anil kapoor  Team esakal
मनोरंजन

राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये काढले दिवस, आता बॉलीवूडचे मोठे स्टार

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर (bollywood actor anil kapoor) यांनी बॉलीवूडमध्ये 38 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्या चित्रपट कारकीर्दीचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे. वो सात दिन (woh saat din) हा त्यांचा पहिला चित्रपट 1983 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र त्यानंतर त्यांनी जे सिनेमे केले, परिंदा (parinda), राम लखन, चमेली का शादी, तेजाब याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यानंतर अनिल कपूर बॉलीवूडचे स्टार झाले होते. (bollywood actor anil kapoor life interesting facts he completes 38 years in the film industry)

आज मुंबईमध्ये अनिल कपूर (anil kapoor) यांचा कोट्यवधी रुपयांचा बंगला आहे. मात्र ते जेव्हा आपल्या परिवारासमवेत मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांना राहण्याची समस्या भेडसावली होती. सुरुवातीच्या काळात ते बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये राहत होते. अनिल कपूर यांचे वडिल सुरिंदर कपूर राज कपूर यांचे वडिल पृथ्वीराज कपूर यांचे भाऊ होते. त्यामुळे जे जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांनी राहण्याचा प्रश्न कपूर यांच्याशी बोलून सोडवला होता.

अनिल यांनी कपिलच्या कॉमेडी नाईट्स मध्ये एक खुलासा केला होता. त्यात त्यांनी सांगितले, मी एका टपोरीचा रोल चांगला केला होता. तो प्रेक्षकांना आवडलाही होता. वास्तविक जीवनात अनिल हे बिनधास्तपणे वागणारे होते. त्यांनी लहानपणा केलेला व्रात्यपणा हा त्यांना या चित्रपटाच्यावेळी कामाला आला होता.

1986 मध्ये आलेल्या चमेली की शादी मध्ये अनिल यांनी लीड रोल केला होता. ती त्यांची पहिली अशी फिल्म होती की त्यात त्यांनी मुख्य भूमिका केली होती. एवढेच नव्हे तर त्या चित्रपटाचे टायटल साँगही त्यांनी गायले होते. गायक म्हणून त्यांचा हा पहिला प्रयत्न होता. आणि तो यशस्वी झाला होता.

1987 मध्ये शेखर कपूर दिग्दर्शित मिस्टर इंडियातील अनिल कपूर यांच्या भूमिकेचे मोठ्या प्रमाणात कौतूक झाले होते. त्यांच्या त्या भूमिकेला प्रेक्षकांकडून पसंती मिळाली होती. मात्र त्या भूमिकेसाठी शेखर कपूर यांची अमिताभ बच्चन यांच्या नावाला पसंती होती. अमिताभ यांनी ती भूमिका करण्यास नकार दिला होता. पुढे ही भूमिका अनिल कपूर यांनी केली. आणि या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले होते.

2013 मध्ये अनिल कपूर काही दिवसांपूर्वी 24 नावाचा टीव्ही शो करत होते. त्यांनी त्या शो मध्ये प्रमुख भूमिका केली होती. ती मालिका लोकप्रिय झाली होती. अनिल यांनी या शो च्या आठव्या सीझनमध्येही काम केले होते. जेव्हा अनिल कपिल शर्माच्या शो मध्ये आले होते. तेव्हा त्यांनी त्या आठवणींना उजाळा दिला होता. त्या कार्यक्रमात ते 24 शो च्या प्रमोशनसाठी आले होते. त्यावेळी कपिलनं खुलासा केला होता अनिल यांच्या स्लमडॉग मिलिनिअरला दोनशे ते अडीचशे अॅवॉर्डस जिंकले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT