Anupam Kher Sakal
मनोरंजन

Anupam Kher: अनुपम खेर यांची बॉडी पाहून अक्षय कुमार थक्क म्हणाला...

अनुपम खेर यांचा शिव शास्त्री बालबोआ हा नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे अभिनयात एखाद्या यूनिवर्सिटीपेक्षा कमी नाहीत. अनुपम खेर यांचा शिव शास्त्री बालबोआ हा नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ते कुस्तीपटूच्या भूमिकेत दिसत आहे. अनुपम खेर यांनी चित्रपटाच्या नवीन पोस्टरसह घोषणा केली आहे ज्यामध्ये त्यांचा लूक चर्चेत आहे. आता बॉलिवूडचा मिस्टर खिलाडीही त्यांचा फिटनेस आणि बॉडी पाहून हैराण झाला असून अक्षय कुमारनेही त्यांचे कौतुक केले आहे.

अनुपम खेर यांच्या आगामी शिव शास्त्री बालबोआ चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले, "प्रिय अनुपम खेर जी, आता तुम्ही थांबा. मी तुम्हाला बॉडी बनवायला सांगितले होते! पण तुम्ही ते खुपचं सीरियसली घेतले. पोस्टर खूपच मनोरंजक दिसत आहे. #ShivShastriBalboa साठी तुम्हाला शुभेच्छा. असेच पुढे जात राहा". फिटनेस फ्रीक अक्षय कुमारने अनुपम खेर यांना या भूमिकेसाठी प्रोत्साहन दिले आहे. अनुपम आता ७० वर्षांचे होणार आहेत. पण त्यांच्या एनर्जी आणि मेहनतीच्या जोरावर ते चाहत्यांना प्रभावित करताना दिसतात.

इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना अनुपम खेर यांनी लिहिले – माझ्या पुढील रिलीजचे नाव आहे #ShivShastriBalboa! एका सामान्य व्यक्तीच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची ही कथा आहे. तुम्हाला हसवण्यासोबतच तुमच्या हृदयात एक सुंदर भावनाही जागृत करेल. हा चित्रपट 10 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जय हो. #shivshatribalboa

अनुपम खेर यांच्या चित्रपटाचे चाहते खुल्या मनाने स्वागत करत आहेत. कमेंट बॉक्समध्ये लोक त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. गुरु रंधावा, नर्गिस फाखरी, जुगल हंसराज यांच्यासह अनेक स्टार्सनी त्यांना प्रोत्साहन दिले आहे. एका चाहत्याने लिहिले, 'मला पूर्ण आशा आहे की या चित्रपटाद्वारे तुम्ही तुमच्या अभिनयाने पुन्हा दहशत निर्माण कराल'. आणखी एका व्यक्तीने लिहिले, 'अनुपम खेर जी, तुम्ही आमच्या सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहात'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT