bollywood actor arjun kapoor shared photo with mangalsutra
bollywood actor arjun kapoor shared photo with mangalsutra  
मनोरंजन

विचार काय हायं पाव्हणं; अर्जुनच्या हातात असलेलं मंगळसुत्र कुणासाठी ?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बॉलिवूडमधला 'मोस्ट वॉन्टेड मुंडा' म्हणून ओळखला जाणारा आभिनेता म्हणजे अर्जुन कपूर. त्याच्या चित्रपटांमधील अभिनयापेक्षा त्याची सोशल मीडिया पोस्ट जास्त चर्चेत असते. सोशल मीडियावर वर्कआऊट करतानाचे फोटो, व्हिडिओ आणि आगामी चित्रपटाबद्दल माहिती तो पोस्ट करत असतो. नुकतीच अर्जुनने एक हटके पोस्ट इस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. फोटो पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

अर्जुन कपूरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्याच्या हातात मंगळसूत्र दिसत आहे. नेमके कोणाचे आहे हे मंगळसूत्र? असा प्रश्न अर्जुनच्या चाहत्यांना पडला. त्याचे उत्तर अर्जुनने फोटोला दिलेल्या कॅप्शनमधून दिले. अर्जुनने कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, 'की एँड का' चित्रपटाच्या वेळची एक आठवण. सेटला आणि माझ्या ऑनस्क्रिन ‘की’ला मिस करत आहे. हा चित्रपट माझ्या जवळचा आहे कारण तो मी माझ्या आईसाठी केला होता आणि करिना तसंच बल्की सरांसोबत काम केल्यामुळे तर तो अधिकच जवळचा आहे. मला वाटतंय आपण याचा सिक्वेल करावा. तुला काय वाटत आहे करीना?'. या चित्रपटाचे कथानक हे कमवती महिला आणि घरात काम करणारा पुरूष या दोघांवर आधारित आहे. करिनाने वर्किंग वुमेनचे काम केले असून अर्जुन घर सांभळताना या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात अर्जुनला करिनाने मंगळसूत्र घालतानाचा एक सिन आहे. या सिनची आठवण म्हणून या मंगळसूत्रा बरोबरचा फोटो अर्जुनने शेअर केला आहे.   

अर्जुन आणि अभिनेत्री करिना कपूर खानच्या ‘की एँड का’या चित्रपटाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने अर्जुनने या चित्रपटाची ही खास आठवण नेटकऱ्यांसोबत शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुनचा 'संदीप और पिंकी फरार' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात परिणीती चोप्रा आणि अर्जुनने प्रमुख भूमिका साकारली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT