मनोरंजन

आयुषमानचा खुल्लमखुल्ला 'लिप लॉक'; नेटकरी म्हणे, 'तुमची बायको'...

कोरोना महामारीचा कहर ओसरल्यानंतर मनोरंजन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी घडू लागल्या.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - कोरोना महामारीचा कहर ओसरल्यानंतर मनोरंजन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी घडू लागल्या. ज्या चित्रपटांचे प्रदर्शन गेल्या दोन वर्षांपासून थांबले होते त्यांचे चित्रिकरण सुरु झाले. रखडलेल्या चित्रपटांचे प्रदर्शनही होत आहे. यासगळ्यात ओटीटी मीडियानं सर्वात मोठा आधार प्रेक्षकांना दिला होता. त्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन झाले होते. सध्या या महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुराणा आणि त्याच्या नव्या चित्रपटाची चर्चा आहे. त्यामध्ये त्यानं दिलेल्या एका सीनची सोशल मीडियावर खास चर्चा रंगली आहे.

यापूर्वी कित्येक अभिनेत्यांनी किसिंग सीन दिले आहेत. त्यामध्ये इमरान हाश्मीच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. त्यानं केलेल्या अनेक चित्रपटांमध्ये किसिंग सीनचा समावेश आहे. आयुषमान खुराणा आणि वाणी कपूर यांच्यातील लिप लॉक सीन आणि त्याची चर्चा व्हायरल झाली आहे. त्यांच्या या इंटिमेट सीननं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. वास्तविक ‘चंडीगढ़ करे आशिकी’ (Chandigarh Kare Aashiqui) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचा एक फोटो सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये वाणी आणि आयुषमानचे फोटो झळकले आहेत. ते फोटो पाहून चाहत्यांना असं वाटत आहे की, आयुषमानच्या या चित्रपटामध्ये त्यानं खूपच इंटिमेट सीन दिले आहेत.

या दोन्ही अभिनेत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन त्यांचे फोटो शेयर केले आहेत. त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. त्या फोटोमध्ये त्यांचा तो लिप लॉक सीन व्हायरल झाला आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. त्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही दिल्या आहेत. आयुषमान आणि वाणी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र येत आहे. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे. हा चित्रपट 10 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. तो फोटो पाहून एका चाहत्यानं कमेंट दिली आहे की, तुमची पत्नी जेव्हा हा चित्रपट पाहिल तेव्हा ती तुम्हाला बोलल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT