John Abraham Net Worth John Abraham New Property:  sakal
मनोरंजन

John Abraham: नववर्षाच्या मुहूर्तावर जॉनने खरेदी केला आलिशान बंगला! किंमत ऐकून व्हाल थक्क

जॉन अब्राहमने नवीन वर्षात मुंबईतील खारमध्ये एक आलिशान बंगला खरेदी केला आहे.

Vaishali Patil

John Abraham New Property: सध्या बॉलिवूड कलाकार हे नवनवीन प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. यात आलिया, सारा , काजोल, जॅकलिन आणि अनन्या पांडे यांनी नवीन अपार्टमेंट खरेदी केले आहे. आता त्यातच आणखी एका बॉलिवूड कलाकाराने नवीन घर घेतले आहे. या अभिनेत्याचे नाव आहे जॉन अब्राहम.

जॉन अब्राहमने नवीन वर्षात मुंबईतील खारमध्ये एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. मिडिया रिपोर्टनुसार या घराची किंमत तब्बल 71 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. लिंकिंग रोड येथे जॉनचे हे नवीन घर आहे. मिडिया रिपोर्टनुसार, जॉनने 27 डिसेंबरला बंगल्याची डील केली.

हा बंगला यापुर्वी प्रवीण नाथ लाल शाह यांचा होता. मात्र आता ते अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथे आपल्या कुटुंबासह राहत असल्याने त्यांनी ही मालमत्ता विकली आहे. जी आता जॉन अब्राहमने खरेदी केली आहे.

ई टाइम्सनं दिलेल्या माहितीनुसार, हा प्लॉट लिंकिंग रोडच्या प्राइम एरियामध्ये आहे, जो शहरातील सर्वात जास्त किंमत असलेला एरिया आहे. जॉनने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. यापुर्वी जॉनने मुंबईतील वांद्रे येथे एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले होते.

जॉन हा केवळ अभिनेताच नाही तर एक उत्तम उद्योगपती देखील आहेत. त्याला रिअल इस्टेटचीही समज आहे. जॉनची एकूण संपत्ती 251 कोटी रुपये आहे. याशिवाय जॉन अनेक ब्रँड्सद्वारे कमाई करतो. जॉन अब्राहमचे एक रेस्टॉरंटही आहे.

याशिवाय तो मुंबई एंजल्स फुटबॉल संघाचाही मालक आहे. जॉन अब्राहम एका वोडका ब्रँडचा मालकही आहे. जॉन अब्राहमचा सिदाक्षण नावाचा परफ्यूम ब्रँडही आहे.

सध्या जॉन अब्राहम मुंबईत एका आलिशान घरात राहतो. जॉनच्या डुप्लेक्स फ्लॅटमध्ये अनेक लक्झरी वस्तू आहेत. जॉनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर येत्या काही दिवसांत जॉन 'तेहरान', 'तारिक' आणि 'वेद' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्णधार पृथ्वी शॉ फेल, महाराष्ट्राच्या संघाला १५४ धावांचा पाठलागही जमेना! SMAT 2025 स्पर्धेत तिसरा पराभव

Crime: एक भीती अन् वडिलांची असहाय्यता... पित्यानं लेकीला अंधाऱ्या खोलीत २० वर्ष कैद केलं, हादरवणारं कारण समोर

Sangli Water Crisis : अशुद्ध पाण्याने किल्लेमच्छिंडगडचे नागरीक त्रस्त; किडनी स्टोनचा धोका वाढतोय!

IndiGo: इंडिगोचं चाललंय काय? 300 पेक्षा जास्त विमानं रद्द; DGCA पासून मंत्रालयापर्यंत बैठकांचा धडाका, आतापर्यंतचे सर्व अपडेट्स

Latest Marathi News Live Update : गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मागितली दोन लाखांची खंडणी

SCROLL FOR NEXT