bollywood actor kabir bedi talked about parveen babi protima in memoir stories i must tell penned in the lockdown 
मनोरंजन

मला 'त्या' दोघींनी व्हिलन बनवलं; कबीर बेदींचं 'स्टोरीज आय मस्ट टेल' चर्चेत 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेते कबीर बेदी यांची चर्चा सर्वोत्तम कलाकारांमध्ये होते. कबीर बेदी हे केवळ आपल्या प्रोफेशनल करिअरमुळेच चर्चेत राहिले असे नाही तर ते त्यांच्या पर्सनल लाईफमुळेही सर्वांच्या चर्चेचा विषय राहिले आहेत. सध्या ते लाईमलाईटमध्ये आले आहेत याचे कारण म्हणजे बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याच्या प्रमुख उपस्थितीत बेदी यांच्या बायोग्राफीचं प्रकाशन झालं आहे. बायोग्राफी 'स्टोरीज आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द एक्टर' (Stories I Must Tell) असं त्या पुस्तकाचे नाव आहे. त्यात त्यांनी आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याविषयी बरेचसे खुलासे केले आहेत.

या पुस्तकामध्ये त्यांनी प्रोतिमा यांच्या सोबतच्या वैवाहिक आठवणींना उजाळाही दिला आहे. त्यांनी त्या पुस्तकामध्ये म्हटले आहे, आमचं ओपन मॅरेज हे सुरुवातीला चांगल चाललं होतं. मात्र मला त्या नात्याची काळजी वाटायला लागली होती. त्याचे कारण म्हणजे आमच्यातील जवळीकता कधीच संपली होती. जे प्रेम मला हवं होतं, ज्या प्रेमाच्या शोधात मी होतो ते मला काही मिळत नसल्यानं माझे मानसिक स्वास्थ्य खराब होऊ लागले होते. त्यामुळे मी एका वेगळ्या निर्णयाप्रत येऊन पोहचलो होतो. मग मी एकटा पडू लागलो. माझ्या एकटेपणाला त्यावेळी परवीन बाबीनं आधार दिला होता.

आपल्या चरित्रात्मक पुस्तकामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, परवीन आणि डॅनी हे एकमेकांच्या प्रेमात होते. ते खुलेपणानं राहतही होते. परवीन ही डॅनीची गर्लफ्रेंड आहे एवढेच मला त्यावेळी माहिती होते. डॅनी हे एक गुड लुकिंग अभिनेता होते. ते माझ्या पेक्षा दोन वर्षांनी लहान होते. ते दोघेही जवळपास चार वर्षे एकत्र होते. मात्र पुढे काही कारणास्तव त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. भलेही लोकं जीन्स घालणा-या आणि सिगारेट फुंकणा-या परवीनला मॉडर्न समजत असतील पण तिचा स्वभाव नेमका त्याच्या उलट होता. हे फार कमी जणांना माहिती आहे. 
 

 
 
 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2025

Suryakumar Yadav : खिलाडूवृत्तीपेक्षा भावना महत्त्वाच्या; हस्तांदोलन टाळण्यावरून सूर्यकुमारचे स्पष्ट मत, नेमकं काय म्हणाला?

Satara fraud:'बहुलेतील एकाची १३ लाखांची फसवणूक'; बनावट कागदपत्रांद्वारे माेटारीची विक्री, सहा जणांवर गुन्हा

Nagpur Crime: नागपुरात कचरा गाडी चालकाचा खून, जुन्या वादातून घडली घटना...

SCROLL FOR NEXT