Nawazuddin Siddique esakal
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui : वेबसीरिजचा दर्जा टीव्हीवरील मालिकांपेक्षाही खालावला

विक्रम चंद्रा लिखित आणि अनुराग कश्यप दिग्दर्शित सेक्रेड गेम्स या (Anurag Kashyap) मालिकेनं भारतीय प्रेक्षकांना वेबमालिकेचं वेड लावलं.

युगंधर ताजणे

Sacred Games: विक्रम चंद्रा लिखित आणि अनुराग कश्यप दिग्दर्शित सेक्रेड गेम्स या (Anurag Kashyap) मालिकेनं भारतीय प्रेक्षकांना वेबमालिकेचं वेड लावलं. असं म्हणायला हरकत नाही. भारतामध्ये नेटफ्लिक्सला मोठ यश हे सेक्रेड गेम्सनं दिलं होतं. त्यानंतर नेटफ्लिक्स भारतात जोरदार फोफावलं. आता मात्र नेटफ्लिक्सला भारतात प्रेक्षकांची ओहोटी (OTT) लागल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भारताचा दौरा केला होता. त्यामध्ये त्यांनी भारतामध्ये प्रेक्षकसंख्या का घटली याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे. वेगवेगळ्या झोनल अधिकाऱ्यांच्या मुलाखती (Bollywood News) घेतल्या आहेत.

आता बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकीनं एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. तसा तो सोशल मीडियावर हल्ली त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यानं बॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये तोंड पाहून कामं दिली जातात. असा धक्कादायक खुलासा केला होता. त्यातही आपल्याला चित्रपटात काम द्यायचे तर जास्तीच्या लाईट्सचा खर्च करावा लागतो असं धक्कादायक विधानही नवाझुद्दीननं केलं होतं. आता तो पुन्हा एकदा वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे.

Bollywood Actor Nawazuddin Siddiqui

नवाझुद्दीननं सध्याच्या टीव्ही मालिकांची तुलना ही ओटीटीच्या वेबमालिकांशी केली आहे. त्यामुळे तो काय म्हणाला आहे हे जाणून घेण्यासाठी त्याच्या चाहत्यांची धडपड सुरु आहे. आता ज्या वेबसीरिज येत आहेत त्यांचा दर्जा अतिशय सुमार असल्याचे नवाझुद्दीननं म्हटलं आहे. भारतामध्ये तर मोठ्या प्रमाणात वेबसीरिज येत आहे. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्यातील आशय तितकासा प्रभावी नाही. काही मोजक्याच मालिका प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरताना दिसत आहे, बाकीचा सगळा आनंदच आहे. मात्र त्यावर कुणी बोलण्यास तयार नाही. असं नवाझुद्दीननं म्हटलं आहे. जेव्हा नवाझुद्दीनची सेक्रेड गेम्स नावाची मालिका आली तेव्हाच त्यानं सांगितलं होतं की, यापुढील काळात क्राईमशी संबंधित अनेक मालिका येणार आहेत. आणि तसे झालेही.

Bollywood Actor Nawazuddin Siddiqui

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan EMI: महिन्याला ३.५ लाख पगार, तरीही १.७ कोटींचं घर घेतलं नाही! EMI पाहून कपलने का घेतला मोठा निर्णय?

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीसाठी जाहीर केला १४ सदस्यीय संघ; दुखापतीचा फटका, तरी मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी मजबूत मोर्चेबांधणी

Viral News : खेळता खेळता ५ वर्षांच्या मुलीने गिळलं ५० ग्रॅम सोनं; डॉक्टरांनी असं काढलं बाहेर!

Marathi News Live Updates : जयपूरमध्ये आशुतोष रांका यांच्यावर हल्ला; ‘भाजपच्या गुंडांकडून सीजेपी कार्यकर्त्यांना मारहाण’ - अभिजीत दिपके यांचा आरोप

Mumbai News: पीओपी मूर्तींबाबत हायकोर्टाचा दिलासा, सहा फुटांवरील गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांत विसर्जनाचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT