bollywood actor pankaj tripathi comment on feminism interview  
मनोरंजन

मुलींना नाही तर मुलांनाच 'फेमिनिझम' शिकवण्याची गरज; कालिनभैय्या सांगतोय

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  आपल्या भूमिकेमुळे बॉलीवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण करणा-या प्रसिध्द अभिनेता पंकज त्रिपाठीचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या अभिनयानं वेगळी उंची गाठली आहे. सध्याच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता म्हणून त्याचे नाव घ्यावे लागेल. त्याचे कारण त्याचा वेगळ्या धाटणीचा अभिनय. गेल्या काही वर्षांपासून पंकज यांनी आपल्या जबरद्स्त अभियनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे त्यांच्या फॅन्समध्येही वाढ झाली आहे. एक अभिनेता असण्याबरोबरच सोशल मीडियावर आपलं विचार ठाम मांडण्यातही त्यांचा पुढाकार असतो. समाजातील चूकीच्या गोष्टींवर ठामपणे बोलणारे जे काही मोजके कलावंत आहेत त्यात पंकजचे नाव घ्यावे लागेल. सध्या ते चर्चेत आले आहेत त्यांच्या फेमिनिझम विषयावरील वेगळ्या वक्तव्यामुळे.

बॉलीवूडमधील प्रतिभावान अभिनेते म्हणून पंकज त्रिपाठी यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, आई वडिल त्यांची पूर्ण उर्जा आपल्या मुलांना सांभाळण्यात खर्च करतात. त्यांना त्यांच्या शिक्षणाची चिंता असते. अशावेळी आपण आपल्या मुलांशी कशाप्रकारे काळजी घ्यावी, त्यांना कशाप्रकारचे मार्गदर्शन हवे आहे याबद्दल ते बारकाईनं विचार करताना दिसत नाही. त्याचा तोटा त्यांना सहन करावा लागत असल्याचेही दिसून आले आहे. या गोष्टींविषयी वेळीच जर विचार केला नाही तर त्याची किंमत मोजावी लागते. मुलांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो.

ज्यावेळी मुलांना शिक्षण देण्याची वेळ येते त्यावेळी पालकांना मोठी चिंता भेडसावयाला लागते. ज्या गोष्टींना जास्त महत्व द्यायला हवे तिकडे दुर्लक्ष केले जाते. मला वाटते की, आज मुलींना ज्यावेळी फेमिनिझमचे धडे द्यायची वेळ येते तेव्हा आता मुलांनाही त्याची माहिती देण्याची गरज आहे. फेमिनिझममध्ये मुलांचा समावेशही केला जावा. असे वाटते. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे मुलांनाही फेमिनिझम समजण्याची गरज आहे. 

 मुलींबरोबर मुलांनाही फेमिनिझमचे शिक्षण मिळाले तर मुलींना वाचविण्याची गरज पडणार नाही. मुलांना तर सुरुवातीपासून असे शिकवले जाते की, ते सर्वांपेक्षा वेगळे आहेत. लिंग भेदभाव त्यांना फार लहानपणापासूनच शिकवला जातो. एक वेळ अशी होती की मी माझ्या पत्नीच्या पगारावर अवलंबून होतो. मला असे वाटत नाही की माझी काही नुकसान झाले. माझी पत्नी आणि मुलीनं मला प्रेरणा दिली आहे. असंही पंकज यांनी यावेळी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: राजकारणात मोठा ट्विस्ट! काकांनी नाकारलं; पवार–शिंदे युतीमुळे नवं समीकरण तयार होणार? पुण्यात पडद्यामागे घडामोडी

Smith Surpasses Dravid: ऑस्ट्रेलिया 'बॉक्सिंग डे' टेस्ट हरले, पण कर्णधार स्मिथने द्रविड-कोहलीला मागे टाकत रचले मोठे विक्रम

Nagpur Municipal Election : ...तर एकत्र लढणार ‘महाविकास आघाडी’; काँग्रेसकडून ३२ जागा सोडण्याची शक्यता

Viral Video: विराट कोहलीचा व्हिडिओ काढण्यासाठी एका ड्रायव्हरने लढवली अनोखी शक्कल, नेटकरी म्हणाले...

Crime News : 'पीडितेने जबाब बदलला तरीही...' मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला हायकोर्टाचा मोठा झटका

SCROLL FOR NEXT