bollywood actor rajkumar rao girlfriend patralekha photos  
मनोरंजन

राजकुमार रावची गर्ल फ्रेंड आहे 'Too Hot'

वृत्तसंस्था

मुंबई : प्रत्येक चित्रपटातून आपली वेगळी जागा निर्माण करणारा अभिनेता म्हणजे राजकुमार राव. सुरुवातीच्या काळात छोट्या भूमिकांमधून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण, तुम्हाला त्याच्या गर्लफ्रेंडविषयी माहित आहे का ? राजकुमारची गर्लफ्रेंड सुंदर आणि तितकिड हॉटही आहे. जाणून घ्या राजकुमारची पार्टनर आहे तरी कोण ! 

बॉलिवूडमधले कपल नेहमीच लाइमलाइटमध्ये असतात. त्यांचे फोटो व्हायरलही होतात. पण बी-टाउनमध्ये असेही कपल आहेत जे कोणत्याही प्रकारचा शो ऑफ करत नाहीत आणि फक्त ऐकमेकांच्या कामाचं कौतुक आणि आदर करतात. असचं बॉलिवूडचं एक कपल आहे ते म्हणजे राजकुमार राव आणि त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखा पॉल. 

पत्रलेखा ही बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल आहे. पत्रलेखाचा जन्म मेघालयातील शिलॉंगमध्ये झाला. तिचे वडिल सी.ए. (CA) आहेत आणि पत्रलेखानेही यात्रक्ष क्षेत्रात करिअर करावं अशी त्यांची इच्छा होती. पण, सुरुवातीपासूनच पत्रलेखाला अभिनयामध्ये रुची होती. 

2014 मध्ये हंसल मेहता दिग्दर्शित 'सिटीलाइट' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पम केलं. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची भेट सिटीलाइट या चित्रपटामधूनच झाली. एका मुलाखतीदरम्यान रिलेशनशिपविषयी बोलताना पत्रलेखा म्हणाली, 'मी राजकुमारला त्याचा पहिला चित्रपट 'लव्ह सेक्स और धोका' मध्ये पाहिलं होतं. माझं राजकुमारविषयीचं मत त्याच्या चित्रपटातील भूमिकेवरुनच तयार झालं होतं. मला वाटलं तोही तसाच आहे.'

पण राजकुमारने सांगितलं की त्याने पत्रलेखाला एका जाहिरातीमध्ये पाहिलं होतं आणि विचार केला की हिच्याशीच लग्न करेन. राजकुमारचा हा किस्सा फिल्मी वाटत असला तरी तो खराच आहे. सिटीलाइट चित्रपटादरम्यानच त्यांची मैत्री झाली आणि पुढे त्याचं रुपांतर  प्रेमात झालं. 

पत्रलेखा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते आणि अनेक बोल्ड फोटो शेअर करते. राजकुमार आणि पत्रलेखा अनेकदा एकत्र स्पॉट होतात. गेले आठ वर्षे ते दोघं एकत्र आहेत. भविष्याची चिंता न करता वर्तमान आम्ही दोघं एन्जॉय करत आहोत असं पत्रलेखा सांगते. लव्ह गेम्स आणि नानू की जानू हे दोन चित्रपट तिने केले आहेत. अनेक मोठ मोठ्या ब्रॅंडसाठी ती अॅड आणि मॉडेलिंग करते. हे कपल लग्न कधी करणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराकडे हवनाऐवजी वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT