मनोरंजन

आलिया-रणबीरच्या लग्नाला यायचं?; विकी कतरिनापेक्षा हटके तयारी

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल आणि कतरिना यांच्या लग्नसोहळ्याची चर्चा अजून सुरु असतानाच आता आणखी लोकप्रिय जोडीविषयीच्या गप्पा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल आणि कतरिना यांच्या लग्नसोहळ्याची चर्चा अजून सुरु असतानाच आता आणखी लोकप्रिय जोडीविषयीच्या गप्पा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. ती म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट. आता त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे चाहत्यांना देखील त्यांच्या लग्नाचे वेध लागले आहेत. दोन वर्षांपासून चाहते रणबीर आणि आलियाला एकच प्रश्न विचारत आहेत तो म्हणजे त्यांचे लग्न. यापूर्वी रणबीरनं त्याच्या एका मुलाखतीमध्ये आपण 2020 मध्ये कोरोनाच्या काळात लग्न केल्याचं सांगितलं होतं. मात्र त्याची ती गोष्ट चाहत्यांना फारशी आवडली नाही. आलिया आणि रणबीर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

विकी आणि कतरिनाच्या लग्नाचे फोटो अजूनही सोशल मीडियावर ट्रेंडिगचा विषय आहे. त्याची चर्चा आहे. चाहत्यांनी त्या फोटोला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. राजस्थानातील एका बड्या हॉटेलमध्ये विकी कतरिनाचं लग्न झालं. त्या लग्नाला बॉलीवूडमधील मोठमोठे सेलिब्रेटी उपस्थित होते. अजून त्याचे फोटो काही व्हायरल झालेले नाहीत. विकी कतरिनानं तर लग्नाला आलेल्या नातेवाईकांना फोटो काढण्यासाठी मनाई केली होती. लग्नानंतर काही वेळानं विकीनं फोटो शेय़र केला होता. लग्नाचे फोटो पाहण्यासाठी वाट पाहणाऱ्या चाहत्यांनी त्यावर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. अजूनही ते फोटो व्हायरल झाले आहेत.

विकी कतरिनाच्या लग्नाच्या निमित्तानं आता रणबीर आलियाच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले आहे. चाहत्यांना या कलाकारांच्या लग्नाचे वेध लागले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा आहे. सोशल मीड़ियावर व्हायरल झालेल्या बातमीनुसार या महिन्यात ते लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र त्याविषयी कोणत्याही प्रकारची कन्फर्म डेट समोर आलेली नाही. रणबीर आलियानं त्यावर कोणतेही भाष्य केलेलं नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी ते राजस्थानातील एका अभयारण्यात ते पर्यटनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. त्यालाही चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या.

रणबीर आणि आलिया आपल्या लग्नाचे कोणतेही विशेष प्लॅनिंग करणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र येत्या काळात रणबीर आलियाचं लग्न विकी कतरिनापेक्षा वेगळं असेल असं त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. त्यांचं वेडिंग डिस्टिनेशन अजून ठरलेलं नाही. 2023 च्या डिसेंबरमध्ये लग्न होणार असल्याचे बोलले जात आहे. एका प्रायव्हेट समारंभाच्या माध्यमातून हा सोहळा होणार असल्याचेही चर्चा आहे. आलिया - रणबीरच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचं झाल्यास तो ब्रम्हास्त्र मध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT