मनोरंजन

'डिट्टो दीपिकासारखीच हवी मुलगी', रणवीरचं 'फॅमिली प्लॅनिंग'

आपल्या वेगळ्यापणासाठी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोण प्रख्यात आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या वेगळ्यापणासाठी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोण प्रख्यात आहे. ते सोशल मीडियाच्या आधारे कायम प्रेक्षकांशी चर्चा करत असतात. संवाद साधत असतात. कोरोनाच्या काळातही त्यांनी चाहत्यांशी संवाद साधत कोरोनाविषयक जनजागृतीसाठी पुढाकार घेतल्याचे दिसुन आले होते. आता रणवीर सिंगनं एक गुड न्यूज दिली आहे. त्यानं त्याविषयी सांगितलं आहे की, येत्या काळात आम्ही गुड न्यूजचा विचार करतो आहोत. यावेळी रणवीरनं तर आपल्याला होणाऱ्या बाळाचे नाव देखील ठरवले असल्याची माहिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय असणारे कपल्स म्हणून रणवीर आणि दीपिकाकडे पाहिले जाते.

त्याचं काय आहे की, सध्या रणवीरकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट आहेत. त्याच्या प्रमोशनसाठी तो सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करतो आहे. आपल्या फॅमिली प्लॅनिंगविषयी त्यानं अशाच एका ठिकाणी पोस्ट केल्याची माहिती समोर आली आहे. त्यात त्यानं आपल्याला डिट्टो दीपिका सारखीच मुलगी हवी असल्याचे सांगितलं आहे. त्या मुलीचं नावही त्यानं ठरवलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. रणवीर आणि दीपिकाला आतापासूनच चाहत्यांनी शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. रणवीरनं जो एक प्रमोशनल व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. त्यात त्यानं ही गोष्ट सांगितली आहे. रणवीर काही दिवसांत त्याच्या रियॅलिटी क्विज शो ला सुरुवात करणार आहे. त्याचा प्रमोशन व्हिड़िओ व्हायरल झाला आहे.

त्या प्रमोशन व्हिडिओच्या दरम्यान त्य़ानं काही गोष्टी शेयर केल्या आहेत. त्यानं सांगितलं आहे की, आपल्याला दीपिकासारखीच मुलगी हवी. मी तर तिचं नाव काय ठेवायचं याचाही विचार केला आहे. रणवीरच्या त्या व्हिडिओला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्याला अनेकांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. जसं की तुम्हाला माहिती आहे माझं लग्न झालं आणि आता एक दोन वर्षात दोन तीन मुलेही होतील. तुम्हाला सांगतो, तुमची वहिनी इतकी सुंदर आहे की, मला तिच्यासारखीच मुलगी हवी आहे. तसं झालं तर माझी लाईफ सेट होऊन जाईल. मी तर मला होणाऱ्या मुलीच्या नावाचा विचारही केला आहे. रणवीरच्या त्या व्हिडिओला मोठया प्रमाणात चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT