मनोरंजन

दुसऱ्या लग्नाच्याच दिवशी सैफने अमृताला लिहिलं होतं पत्र

'कॉफी विथ करण'मध्ये खुद्द सैफने मुलगी सारा अली खानसमोर पत्राबद्दल सांगितलं होतं.

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान (saif ali khan) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. सैफने 1991 साली अभिनेत्री अमृता सिंगसोबत (amrita singh) लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2004 मध्ये सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला. 'टशन' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सैफ अभिनेत्री करीना कपूरच्या (kareena kapoor) प्रेमात पडला. सैफ व करीनाने २०१२ मध्ये लग्न केलं. या लग्नाच्याच दिवशी सैफने पूर्वाश्रमीची पत्नी अमृताला पत्र लिहिले होते. या पत्राबद्दल सैफने 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमामध्ये सांगितले होते.

'कॉफी विथ करण' या कार्यक्रमामध्ये सैफने मुलगी सारा अली खानसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने सांगितले होते की, 'अमृताला मी भावनिक पत्र लिहिलं होतं. अर्थात आम्ही जो चांगला काळ व्यतित केला त्याबद्दल आणि भविष्याबद्दल हे पत्र होतं. पत्र लिहून झाल्यानंतर मी ते करीनाला दाखवलं होतं. तिनं खूप शांतपणे ते पत्र वाचलं. हे पत्र मी अमृताला पाठवलंच पाहिजे असंही तिनं मला सांगितलं. तिनं मला तेव्हा पाठिंबा दिला होता.'

२० डिसेंबर २०१६ रोजी करीना आणि सैफच्या घरी एका चिमुकल्याचे आगमन झाले. त्याचे नाव त्यांनी तैमुर असे ठेवले. तैमुर सध्या चार वर्षांचा आहे. ऑगस्ट २०२० मध्ये करीना गरोदर असल्याची आनंदाची बातमी सैफ अली खानने सोशल मीडियावर दिली होती. २१ फेब्रुवारी २०२१ साली सैफ आणि करीनाला दुसरा मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी जहांगीर असे ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT