sanjay dutt 
मनोरंजन

संजू बाबाने घेतला वॅक्सिनचा पहिला डोस ; डॉक्टरांचे मानले आभार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलिवूडमध्ये आपल्या स्टईल आणि हटके अंदाजामुळे  प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कलाकार म्हणजे संजय दत्त. संजयच्या बोलण्याच्या, चालण्याच्या स्टाईलला अनेक जण कॉपी करतात. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. संजयला त्याच्या चाहते 'बाबा' किंवा 'संजू' या नावाने संबोधतात. नुकतेच  कोरोनाची लस घेऊन त्याच्या चाहत्यांना लस घेण्याबाबत प्रेरित केले आहे. लस घेतानाचे फोटो संजयने सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. 

संजय दतने लस घेतानाचे फोटो शेअर करून कॅप्शन लिहीले,'बीकेसी वॅक्सिन सेंटरमध्ये आज मी कोव्हिड-19 वॅक्सिनचा पहिला डोस घेतला. मी डॉक्टर डेरे आणि त्यांच्या पुर्ण टीमचे एवढे चांगले काम करण्यासाठी अभिनंदन करतो. मला त्याच्या मेहनती विषयी प्रेम आणि सन्मान वाटतो.जय हिंद!'.

संजय दत्तचे हे ट्विट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्याच्या चाहत्यांनी या ट्विटला रिप्लाय देऊन वॅक्सिन घेतानाचा फोटो शेअर करत लिहीले, ' मी पण घेतले वॅक्सिन'. तर एका चाहत्याने लिहीले,'दौड़ेगा भागेगा, बाबा वैक्सीन के लिए कुछ भी करेगा'.

1981 साली 'रॉकी' चित्रपटातून संजय दत्तने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तेजा,वास्तव, खलनायक, लगे रहो मुन्ना भाई, मुन्ना भाई एम बी बी एस या हिट चित्रपटांमधून संजय प्रेक्षकांच्या भेटीस आला. 'संजू' चित्रपट हा संजय दत्तच्या जीवनावर आधारीत चित्रपट  2018 साली प्रदर्शित झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT