actor shahid kapoor
actor shahid kapoor  Team esakal
मनोरंजन

'आयुष्यात पहिल्यांदाच असं काम करतोय'...

युगंधर ताजणे

मुंबई - प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर (bollywood actor shahid kapoor) त्याच्या वेगळ्याप्रकारच्या अभिनयासाठी ओळखला जातो. सोशल मीडियावरही (social media active actor) तो अॅक्टिव्ह असणारा कलाकार आहे. सध्या त्यानं वेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जी गोष्ट शाहिदनं कधीच केली नव्हती, ती त्याला करावी लागणार आहे. यासाठी तो कमालीचा नर्व्हस झाला आहे. जब वी मेट, कमीने, हैदर आणि कबीर सिंग मधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या शाहिदनं आता ओटीटी (ott platform) प्लॅटफॉर्मवर येण्याची तयारी सुरु केलीयं. (bollywood actor shahid kapoor feeling nervous about making digital debut)

शाहिद आता पहिल्यांदाच वेबसीरिजमध्ये (web serise) दिसणार आहे. मात्र त्या मालिकेचं नाव अजून काही ठरलेलं नाही. शाहिदच्या या मालिकेचे लेखन राज निदिमोरु आणि कृष्णा डीके यांनी केलं आहे. सध्या प्रचंड गाजणा-या द फॅमिली मॅन या मालिकेचे लेखनही या दोघांनी केले होते. त्यामुळे चाहत्यांना आता शाहिदच्या कमबॅकचे वेध लागले आहेत.

शाहिद आपल्या डिजिटल डेब्युसाठी थोडा नर्व्हस झाला आहे. तो पहिल्यांदाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. त्याचे असे म्हणणे आहे की, ज्या कलाकारांना मोठ्या पडद्यावर वाहवा मिळाली आहे, त्यांना गरज नाही की, डिजिटल प्लॅटफॉर्मवरही त्यांचे कौतूक व्हावे. हा प्रश्न दोन वेगवेगळ्या माध्यमांचा आहे. काही दिवसांपूर्वी शाहिदनं एक इंस्टाग्राम लाईव्ह केलं होतं. त्यात त्यानं कबीर सिंगला दोन वर्षे झाली आहेत हे सांगितले होते.

मोठ्या पडद्याची गोष्ट सांगायची झाल्यास शाहिद कपूर आता लवकरच जर्सी नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. जर्सी हा चित्रपट साऊथच्या एका चित्रपटाचा रिमेक आहे. गेल्या वर्षभरापासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहे.

कबीर सिंगमध्ये शाहिदच्या अभिनयानं चाहत्यांना जिंकून घेतले होते. तेव्हापासून तो चर्चेत आला होता. एका वेगळ्या प्रकारची भूमिका साकारुन त्यानं आपण व्हर्सेटाईल अभिनेते असल्याचे दाखवून दिले होते. जर्सीमध्ये शाहिद एका क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT