मनोरंजन

'महाभारत' घडल्यावर आर्यन जेलमध्ये वाचतोय रामायण

आर्यन खानला अद्याप कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही.

सकाळ डिजिटल टीम

आर्यन खानला अद्याप कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. तो मुंबईतील ऑर्थर जेलमध्ये आहे. त्याच्या प्रकरणावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आर्यन खाननं साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याला वाचविण्यासाठी शाहरुख खान प्रयत्नशील आहे. त्यानं जेलमध्ये जावून आर्यनची भेटही घेतली आहे. त्याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यापूर्वी आर्यनच्या आईनं गौरी खाननं त्याची भेट घेतली होती. ती त्याच्यासाठी बर्गर घेऊन गेली होती. मात्र तुरुंग प्रशासनानं त्याला ते पदार्थ देता येणार नाहीत. असे सांगितले होते. कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार आर्यनला सर्वसामान्य कैद्यांप्रमाणे ठेवण्यात यावे. त्याच्यासाठी कुठलेही वेगळे नियम असणार नाहीत. असे सांगितले होते.

सध्या आर्यन खानचे तुरुंगातील वेळापत्रक काय आहे याची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खान वेळ काढून पुस्तकांचे वाचन करताना दिसून आला आहे. त्यानं जेलमधील लायब्ररीतुन काही पुस्तके वाचण्यासाठी आणली आहेत. त्यात रामायणही असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. आर्यन खान हा इतर सर्वसामान्य कैद्यांसारखा रोज सहा वाजता उठतो. त्यानंतर त्याचे जेलमधील काम सुरु होते. तुरुंग प्रशासनाच्या वेळापत्रकाप्रमाणे त्याला कामं करावी लागत असून त्यांच्या नियमांचे पालन करावे लागत आहे. तो मुंबईतील ऑर्थर रोड येथील जेलमध्ये कैद आहे.

यापूर्वी आर्यन खानच्या समर्थनार्थ शाहरुखच्या चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर मोठ्य़ा प्रमाणात उपस्थिती लावली होती. त्या फोटोंना सोशल मीडियावरुन प्रसिद्धी मिळाली. काही बॉलीवूड सेलिब्रेटींनी किंग खानला सपोर्ट केला आहे. तर काहींनी आर्यनच्या बाजूनं प्रतिक्रिया देऊन त्याच्याप्रती सहानुभूती दर्शवली आहे. त्यात प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी आर्यन खान हा हाय प्रोफाईल असल्यानं त्याच्याविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. असा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. सध्या आर्यन खान हा तुरुंगामध्ये रामायण आणि गोल्डन लायन ही पुस्तकं वाचत आहे. यापूर्वी त्याला क्वॉरनटाईन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. आता जनरल वॉर्डमध्ये आहे. तुरुंग प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार त्याला सर्वसामान्य कैद्यांप्रमाणे ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT