LinkedIn News esakal
मनोरंजन

LinkedIn: सुनील शेट्टी चक्क 'Linkdin' वर, 'प्रोफाईल' वाचलंय?

बॉलीवूडमध्ये आपल्या वेगळ्या शैलीनं, अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सुनील शेट्टीच्या नावाचा उल्लेख केला जातो.

युगंधर ताजणे

Suniel Shetty News: बॉलीवूडमध्ये आपल्या वेगळ्या शैलीनं, अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सुनील शेट्टीच्या नावाचा उल्लेख केला जातो. तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये अण्णा या नावानं प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या (Bollywood Actor) कारणासाठी तो सोशल मीडियावर चर्चेत असणारा आता लोकप्रिय अशा लिंकडेन वर आला आहे. त्यावरील त्याचा बायो वाचून आपल्याला (Bollywood Celebrity News) धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. वास्तविक सुनील शेट्टीला लिंकडेनवर अपडेट करण्याची गरजच काय असा प्रश्न ती पोस्ट पाहिल्यावर नेटकऱ्यांनी विचारला आहे. सोशल मीडियावर सध्या सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.

लिंकडेनवर अपलोड केलेल्या बायोमध्ये सुनील शेट्टी म्हणतो, सर्वात प्रथम मी लिंकडेन यांचे आभार मानतो. फायनली मी लिंकडेनवर आलो आहे. माझं वय 61 वर्षांचे आहे. माझ्या आयुष्याचा प्रवास आताच सुरु झाला आहे यावर माझा ठाम विश्वास आहे. मी काही वेगळ्या गोष्टी स्क्रिनवर केल्या आहेत. याशिवाय स्वताला शाररिक आणि मानसिदृष्या खंबीर ठेवले आहे. स्वताला चांगला आकार देता येईल एवढं शिक्षणही घेतलं आहे. मी आणि माझे कुटूंबीय यांनी यापूर्वी विप्ला फाउंडेशनच्या माध्यमातून मदत केली आहे. याशिवाय वेगवेगळ्या सामाजिक कामांमध्ये सक्रिय सहभागही घेतला आहे. कोरोनाच्या काळात देखील अनेकांन मदतीचा हात दिला आहे.

suniel shetty news

खरं सांगू, माझ्या आयुष्यात मी देवाला नेहमीच मोठं स्थान दिलं आहे. नशीबावर माझा विश्वास आहे. आम्ही आमच्या वडिलांना हॉटेलात मदत करत असू. त्यांच्याकडून मला शिस्त म्हणजे काय असते, हे कळलं, समाजात आपण कसे वागले पाहिजे हे माहिती झाले, त्यानंतर मी त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकलो. ज्या मला माझ्या प्रवासात उपयोगी पडल्या आहेत. नशीबानं खूप काही गोष्टी शिकवल्या आहेत. अजुन शिकतो आहे. माझे वडिल हेच माझे हिरो आहेत. त्यांच्याकडून आयुष्यातील शाळेचे धडे मी गिरवले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून मी खूप काही गोष्टी शिकलो आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती मिळाली आहे. नवउद्योजकांकडून भन्नाट आयडिया मिळाल्या आहेत. त्यातून मी नवं काही सुरु केलं आहे. मला 40 वर्षांहून अधिक उद्योगविश्वाचा अनुभव आहे. आजही मला माझा पहिला जॉब आठवतो तेव्हा त्या आठवणींनी भावूक व्हायला होतं. त्याचं योगदान माझ्या आयुष्यात खूप मोलाचा आहे. असं ही सुनील शेट्टीनं म्हटलं आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा बायो चर्चेत आहे. त्यावर त्याला वेगवेगळ्या कमेंट्स देखील मिळाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance Tips: हेल्थ इन्शुरन्स घेताना या गोष्टी तपासल्या नाहीत तर Claimच्या वेळी बसू शकतो मोठा धक्का!

IND vs WI: मॅचच्या काही तास आधी मोठं संकट! इकाना स्टेडियमजवळ गोमतीचं पाणी, अंडरपास जलमय; भारत-वेस्ट इंडिजच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह?

‘मला पाहून महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या’; दृश्यममधील गायतोंडे फेम कमलेश सावंत म्हणाले...‘ही खंत आयुष्यभर राहील’

Marathi News Live Updates: ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर कर्जतला पहाटे दाट धुक्याची चादर; आल्हाददायक वातावरणाने नागरिक सुखावले

Kolhapur Gokul Election: ‘गोकुळ’च्या एका जागेवरून महायुतीत तिढा; राष्ट्रवादीला आणखी एक जागा, यड्रावकर गटाच्या जागेवरून घमासान

SCROLL FOR NEXT