मनोरंजन

'उरी' चित्रपट करायचाच नव्हता, पण जेव्हा...

सध्या विकी कौशल आणि कॅटरिना दोघेही चर्चेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - सध्या विकी कौशल आणि कॅटरिना दोघेही चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे पुढील महिन्यात त्याचा पार पडणारा विवाहसोहळा. दोघेही बॉलीवूडमधील मोठे सेलिब्रेटी आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्या दोघांच्या अफेयरची चर्चा रंगली होती. ते लग्न करणार असल्याचे सोशल मीडियावर चर्चिले जाऊ लागले. त्यानंतर त्या दोन्ही सेलिब्रेटींनी आपल्या लग्नाविषय़ी प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे आपल्या सरदार उधमसाठी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या आहेत. त्या दरम्यान त्यानं वेगवेगळ्या प्रकारचे खुलासेही केले आहेत. असाच एक खुलासा हा उरी या चित्रपटाच्या वेळचा आहे. त्यामध्ये त्यानं आपल्याला त्या चित्रपटाच्यावेळी आलेल्या अनुभवाविषयी सांगितलं आहे.

विकी कौशलला उरी या चित्रपटानं मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवून दिली होती. तो त्याच्या अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता असला तरी त्याच्या आतापर्यतच्या लोकप्रियतेत उरीचा वाटा मोठा आहे. उरीनं त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं. त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात तेव्हाही होती. आणि आजही आहे. त्यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यातही आले होते. उरी द सर्जिकल स्ट्राईक मध्ये विकी कौशलनं मेजर विहान शेरगीलची भूमिका केली होती. विकी कौशलचा चाहतावर्ग मोठा आहे. या गेल्या महिन्यात त्याच्या सरदार उधमलाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले आहे.

विकीनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, मला उरी हा चित्रपट करायचचा नव्हता. मात्र जेव्हा त्याच्याबद्दल मी ऐकलं तेव्हा आपल्याला ही संधी सोडायची नाही यावर ठाम असण्यापर्यत तो गेला होता. विकीनं सांगितलं की, मला उरीची कथा सुरुवातीला निराशाजनक वाटली होती. मात्र त्यातील बारकाव्यांचा मी जेव्हा विचार केला तेव्हा हा चित्रपट आपण सोडणार नाही. असं त्यानं ठरवलं. शेवटी उरीमध्ये त्यानं मुख्य भूमिका करुन चाहत्यांची वाहवा मिळवली होती. हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्यानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाईही केली होती. सुरुवातीच्या काळात आपण त्या चित्रपटाशी कनेक्टच होत नव्हतो. अशीही भावना विकीनं व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

Bihar Laborer Killed in Sangli : मित्रानेच काढला काटा! जुन्या धामणीत नदीकाठी बिहारी मजुराचा धारदार शस्त्राने चिरला गळा; सांगलीत 72 तासांत पाचवा खून

Pune News: हिंजवडीत दूषित पाणी पिण्याची नामुष्की; सोसायट्यांमधील स्थिती, शुद्धीकरणानंतरही दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

SCROLL FOR NEXT