Bollywood actors visited Maharashtra CM Eknath Shinde's house Esakal
मनोरंजन

Ganesh Chaturthi 2023: गणपती दर्शनासाठी सीएम शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी! व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Bollywood actors Visit CM Eknath Shinde House: मुंबईत सध्या गणेश उत्सवाची धुम सर्वत्र आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी रविवारी सायंकाळी बॉलिवूमधील अनेक कलाकारांनी वर्षा बंगल्यावर हजेरी लावली.

बॉलिवूडचा दबंग सलमान खान शाहरुख खान पासून आशा भोसले पर्यंत अनेक स्टार्स यांनी एकनाथ शिंदे यांच्या घरी जात गणपतीचे दर्शन घेतले. कार्तिक आर्यन, एकता कपूर आणि शिल्पा शेट्टीनंतर एकनाथ शिंदे यांच्या घरी स्टार्सची गर्दी पाहायला मिळाली.

यावेळी शाहरुख खान आपल्या मॅनेजरसोबत पोहोचला होता. एकनाथ शिंदे यांनी शाहरुखचे जोरदार स्वागत केले. एकनाथ शिंदे यांनी शाहरुखचे पुष्पगुच्छ ,शाल श्रीफळ देऊन गळाभेट देत स्वागत केले. तर सलमान खान देखील बहिण अर्पितासोबत दिसला. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

गायिका आशा भोसलेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचल्या. गदर 2 मुळे चर्चेत आलेली अमिषा पटेल देखील यावेळी दिसली. 'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीही यावेळी दिसली. 'बिग बॉस OTT 2' चा विजेता एल्विश यादवने देखील सीएम शिंदे यांच्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. सुनील ग्रोव्हरही यावेळी दिसला.

यावेळी सुनिल शेट्टी आणि जॅकी श्राफदेखील देवाच्या भक्तीत लीन दिसले.

याप्रसंगी अभिनेत्री पूजा हेगडेसोबतच अनेक अभिनेत्रींना हजेरी लावली होती. यावेळी सर्व कलाकारांनी गणपतीची आरती करत बाप्पाचे आशिर्वाद घेतले. तर शिंदेकडून सर्वांना गणपती बाप्पाची मूर्तीही भेट म्हणून देण्यात आली. सध्या सोशल मीडियावर सर्व कवाकारांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT