Bollywood actress Chrisann Pereira released from Sharjah jail drug case sakal
मनोरंजन

Chrisann Pereira: अभिनेत्री क्रिसन परेराची तुरुंगातून सुटका; ड्रग्ज तस्करी प्रकरणात झाली होती अटक..

अभिनेत्रीच्या भावानं दिली माहिती..

नीलेश अडसूळ

Chrisann Pereira: 'सडक 2' चित्रपटातून झळकलेल्या अभिनेत्री क्रिसॅन परेराला(Chrisann Pereira) अटक झाली होती. क्रिसॅनला ड्रग्ज प्रकरणी शारजाह तुरुंगात ठेवण्यात आले होते. पण तिची काल २६ एप्रिल रोजी तुरुंगातून सुटका झाली. येत्या ४८ तासात ती भारतात परतण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहेत.

क्रिसॅन परेराची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तिचा भाऊ केविननं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो क्रिसॅनसोबत व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसत आहे. 'क्रिसन ची सुटका झाली असून ती पुढील 48 तासांत ती भारतात असेल' असे कॅप्शन त्याने दिले आहे.

पूर्व वैमनस्यातून क्रिसॅन आणि डी जे क्लेटन रॉड्रिग्जला अडकवल्याचा संशय आहे.  पोलीस या प्रकरणाचा पुढे तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिसॅन परेराची फसवणूक करून शारजाला पाठवून सोबत अमली पदार्थ देऊनअडकवल्याचा आरोप अँथोनी पॉल आणि राजेश बोभाटे यांच्यावर करण्यात आला  आहे.

झाले असे की, क्रिसन परेराला ऑडिशनसाठी शारजाह, संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे पाठवण्यात आले. फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी  तिला एक ट्रॉफी देण्यात आली. या ट्रॉफीमध्ये ड्रग्स होते. तिला सांगण्यात आले की ही ट्रॉफी ऑडिशन प्रॉपचा भाग आहे.

आणि पुढे शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी क्रिसॅन परेराला अटक करण्यात आली. नंतर तिला शारजा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले होते. तपासादरम्यान, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना समजले की, अँथोनी पॉल हा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT