bollywood actress dia mirza is going to be mother soon share photo on instagram 
मनोरंजन

लग्नं झालं, सव्वा महिन्यातचं अभिनेत्रीनं दिली 'गुड न्यूज' 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडची अभिनेत्री दिया मिर्झाचं काही दिवसांपूर्वी लग्न झालं होत. मोठ्या धुमधडाक्यात तिचं लग्न पार पडलं. त्याला निवडक पाहुणे निमंत्रित होते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दियानं सगळी व्यवस्था केली होती. मात्र आता असं काही घडलं आहे त्यामुळे दिया चर्चेत आली आहे. तिनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दियाचं लग्न होऊन केवळ सव्वा महिना झाला आहे. तेवढ्यात तिनं गुड न्युज दिली आहे. त्यामुळे तिच्यावर एकीकडे कौतूकाचा वर्षाव होतो आहे. दुसरीकडे तिला ट्रोल करण्यात आले आहे. काहींनी तिी ही बातमी ऐकून तिच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी दियाच्या दुस-या लग्नाची चर्चा सुरु होती. आता तिच्या गुड न्युजच्या चर्चेनं दिया प्रसिध्दीच्या झोतात आली आहे.

दियानं इंस्टावर एक पोस्ट शेअर करुन आपण प्रेग्नंट असल्याची माहिती दिली आहे. ती बातमी कळताच फॅन्सनं तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. दियानं जो फोटो शेअर केला आहे त्यात तिचा बेबी बंप दिसतो आहे. ती एका समुद्राच्या किनारी उभी असल्याचे त्या फोटोमध्ये दिसते आहे. वैभव रेखीनं हा फोटो क्लिक केला आहे. दियाच्या बेबी प्लाँटला तिच्या चाहत्यांनी पसंत केलं आहे. तिचं कौतूकही केलं आहे. दिया सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. एक अभिनेत्री म्हणून तिनं बॉलीवूडमध्ये फारसं नावं कमावलं नसलं तरी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहत लाईमलाईटमध्ये राहणं दियाला जमलं आहे.

दियानं बेबी प्लाँटचा फोटो इंस्टावरुन शेअर करुन तिच्या चाहत्यांना एक गोड बातमी दिल आहे. दियानं तो फोटो शेअर करुन असं लिहिलं आहे, धरणी मातेकडून मला आशीर्वाद मिळाला आहे. माझ्या गर्भात असणा-या सुंदर जीवाचं असणं हे आता मी अनुभवते आहे. याचा मला विशेष आनंद आणि समाधान आहे. काही दिवसांपूर्वी दिया वैभव रेखी आणि त्याची मुलगी समायरा याच्यासोबत मालदीवला गेली होती. तिथं तिनं सुट्टी घालवली. लग्नाअगोदर तिनं आपल्या पतीसोबत स्पेशल व्हॅकेशन इंजॉय केले होते. सोशल मीडियावर त्याबाबतचे फोटो व्हायरल झाले होते.

15 फेब्रुवारीला वैभव रेखी आणि दियानं लग्न केलं होतं. आता तर तिनं गोड बातमीही सांगितली आहे. दियानं केवळ तिचाच फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाही तर वैभव आणि समायराचाही फोटो शेअर केला आहे. यावेळी दियानं हिरव्या रंगाची एक बिकिनी घातली होती. मालदीव वरुन दियानं आणखी एक फोटो शेअर केला होता. त्यावेळी तिनं व्हाईट कलरची मॅक्सी परिधान केली होती. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

ED summons : ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अन् सोनू सुदला ईडीचं समन्स,'या' तारखेला होणार चौकशी, अडचणी वाढणार?

Pune Crime : काल बापाने न्यायालयात एन्काउंटरची भीती केली व्यक्त, आज कृष्णा आंदेकर पोलिसांनी शरण; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

IND vs PAK: जय शाह यांचा पाकिस्तानला दणका; आशिया कपवर बहिष्काराची दिलेली धमकी, आता तोंडावर आपटण्याची वेळ

Sharad Pawar : 'देवाभाऊं'नी महाराजांचे नाव घेऊन बळीराजाकडे ढुंकून पाहिले नाही: शरद पवार

SCROLL FOR NEXT