Dia Mirza esakal
मनोरंजन

Photo Viral: दिया मिर्झा पहिल्यांदाच दिसली छोट्या 'अव्यान' सोबत

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झानं (Dia Mirza) तिच्या मुलासोबतचा फोटो पहिल्यांदाच सोशल मीडियावर शेयर (Social Media News) केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood News: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झानं (Dia Mirza) तिच्या मुलासोबतचा फोटो पहिल्यांदाच सोशल मीडियावर शेयर (Social Media News) केला आहे. त्याचं नाव अव्यान असं आहे. दियानं काही दिवसांपूर्वीच गुड न्युज चाहत्यांना शेयर केली होती. मात्र फोटो व्हायरल (Photo Viral) केले नव्हते. त्यामुळे आता तिनं व्हायरल (Bollywood Actress) केलेल्या फोटोंना चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे. तिचं कौतूक करुन तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. अव्यान आझाद रेखी (Avyaan Mirza) असं दियाच्या मुलाचं नाव आहे. त्या फोटोंना बॉलीवूडमधील प्रख्यात अभिनेत्री बिपाशानं देखील कमेंट केली आहे. तिनं दियाला शुभेच्छाही दिल्या आहेत. बऱ्याच दिवसांनंतर दिया अव्यानसोबत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

दियानं त्या पोस्टला एक कॅप्शनही दिली आहे. त्यामध्ये ती लिहिते की, "Imagine," तिनं ती पोस्ट पती वैभव रेखीला टॅग केली आहे. बिपाशानं म्हटलं आहे की, सुंदर आई अन् गोंड़स बाळ. तिच्या या प्रतिक्रियाला नेटकऱ्य़ांची पसंती मिळाली आहे. बिपाशाशिवाय करिश्मा कपूर, डायना पेंटी, आदिती राव हैदरी, गुल पनाग आणि सृष्टी भेळ यांनी देखील दियाच्या फोटोवर कमेंटस केल्या आहेत.

दिया आणि वैभव हे गेल्या वर्षी मे मध्ये आई बाबा झाले. मात्र काही कारणास्तव दियाला बाळाच्या प्रकृतीसाठी रुग्णालयात राहावे लागले होते. दरम्यान तिला काही बॅक्टेरियल इन्फेक्शनही झाले होते. त्यावेळी दियानं सोशल मीडियावरुन आई झाल्याची बातमी सांगितली होती. दियाच्या लग्नाची चर्चा झाली होती. कोरोनाच्या काळात तिनं लग्न केलं. तेव्हा निवडक कुटूंबियांच्या उपस्थित तो लग्न सोहळा पार पडला होता. प्रेग्नंसीच्या काळात दियानं तिचे अनुभवही सोशल मीडियावर शेयर केले होते. आई होण्याचा अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जाणारा आहे. असेही तिनं सांगितले होते. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दिया आणि वैभवनं लग्न केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मुंबई पुणे एक्सप्रेस वे'वर वाहतूक कोंडीतही टोल वसुली, मनसेच्या दणक्यानंतर पैसे परत करण्याचं IRBचं आश्वासन

T20 WC, IND vs PAK: भारतीयांसमोर पाकच्या फिरकीचे आव्हान; सायंकाळपर्यंत पावसाचा अंदाज, मात्र त्यानंतर खेळ होण्याची शक्यता

CM Yogi Adityanath: लाडक्या बहिणींना १५०० रुपये पेन्शन; योगी सरकारची मोठी योजना, पाहा कोणा-कोणाला होणार फायदा

Ind vs Pak: यालाच म्हणतात तयारी! पाकिस्तानला भिडण्यासाठी सूर्यकुमार यादव बनला ‘उस्मान तारिक’, नेट्समध्ये गोलंदाजीची हुबेहूब नक्कल

Satara Tourist Death: सातारच्या पर्यटकाचा राजगडावर हृदयविकाराने मृत्यू; सकाळीच्या सुमारास बालेकिल्ल्याचे दर्शन घेतलं अन् काय घडलं?

SCROLL FOR NEXT