Bollywood News: बॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी मळलेली वाट सोडून स्वताची वेगळी वाट निर्माण करण्याचा विचार केला. त्यात त्यांना अनेक अडचणींना सामोरंही (Bollywood Actress) जावं लागलं. मात्र त्यात त्या यशस्वी झाल्या. प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचं धाडस त्यांनी दाखवलं म्हणून त्यांना प्रेक्षकांनी उचलून धरलं. या लेखाच्या (Entertainment News) निमित्तानं आपण अशाच बॉलीवूडमधील अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी कायम इतरांपेक्षा वेगळा विचार केला. आपल्याबद्दल लोकं काय बोलतात (Kareena Kapoor) याचा जराही विचार न करता आपण जे बोलतो त्यावर ठाम राहून इतरांपुढे एक वेगळे स्थानही त्यांनी निर्माण केलं आहे.
दिया मिर्झा - गेल्या वर्षी वैभव रेखी सोबत दियानं लग्न केलं होतं. त्या लग्नावरुन तिला नेटकऱ्यांच्या विरोझाला सामोरं जावं लागलं होतं. दियानं त्या लग्नामध्ये कन्यादान आणि पाठवणी या विधींना फाटा दिला होता. त्यावरुन तिच्यावर टीका झाली होती. तिनं त्याविरोधात नेटकऱ्यांना उत्तर दिलं होतं. कतरिना कैफ - कतरिनानं तर आपल्या चारही बहिणींना लग्नात मिरवले होते. त्याचीही चर्चा झाली. मुळची परदेशी असणारी कतरिना आता भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारी अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचा फॉलोअर्सही मोठा आहे. लोकं काहीही म्हणाली तरी आपल्याला जे खरं वाटतं ते करण्यास ती कधीही मागेपुढे पाहत नाही. करिना कपूर खान - सैफ अली खानशी लग्न करणार असं म्हटल्यावर करिनाला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले होते. तिनं प्रेग्नंसीवर एक पुस्तक लिहिलं होतं. त्यावरुनही तिला नावं ठेवण्यात आली होती. करिनानं या साऱ्याचा कधीही विचार केला नाही. तिच्या मुलांच्या नावावरुन ट्रोल करण्यात आले. मंदिरा बेदी - 2021 मध्ये मंदिराच्या पतीचं राज कौशलचं निधन झालं. त्यानंतर मोठ्या संकटात आलेल्या मंदिरानं मोठ्या जिद्दीनं स्वताला सावरलं. आपल्याकडे पुरुषच अंतिम संस्कार करतात. मात्र मंदिरानं ती प्रथा मोडीत काढत स्वत पतीच्या पार्थिवाला अग्नी दिला होता. सुश्मिता सेन - सुश्मिताचा बॉलीवूडमधील करिअर ग्राफ हा नेहमीच चढता - उतरता राहिला आहे. विश्वसुंदरीचा खिताब तिनं मिरवला खरा. मात्र त्याचा उपयोग बॉलीवूडसाठी झाला नाही. त्याकरिता तिला संघर्ष करावा लागला. तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यावरुन अनेकदा ट्रोल करण्यात आले होते. मात्र ती त्याविरोधात उभी राहिली.
प्रियंका चोप्रा - अमेरिकेत स्थायिक झालेल्या प्रियंकानं निक जोन्सशी लग्न केलं. दोघांच्या वयात दहा वर्षांचं अंतर आहे. प्रेमात त्यांच वय आड आलं नाही. त्यामुळे त्यांच्या नात्यात कोणताही दुरावा आला नाही. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.