bollywood actress disha patani commented on shirtless photo of tiger shroff 
मनोरंजन

टायगरनं टी शर्ट काढल्यावर दिशाचा कडक रिप्लाय; फोटो बघाच..

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - भलेही बॉलीवूडमध्ये कोरोनानं सर्वांना चिंतेत पाडलं असेल तरीही सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर आपलं काम सुरु ठेवलं आहे. मागच्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या माध्यमांतून चाहत्यांशी संपर्क ठेवला होता. कधी योगा, कधी खास रेसिपी तर कधी डान्सचे व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांचे मनोरंजन केले होते. त्यामुळे कलाकारांचा टीआरपी टिकून होता. आताही वेगळी परिस्थिती बॉलीवूडवर ओढावली आहे. त्याचा परिणाम अनेक मालिका आणि चित्रपटांच्या चित्रिकरणावर झाला आहे. त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यासमोरील डोकेदुखी वाढली आहे. अशात काही जण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहून चाहत्यांबरोबर संवाद साधत आहेत. अॅक्टि्व्ह राहत वेगवेगळे व्हिडिओ शेअर करुन लक्ष वेधून घेत आहेत.

आता बॉ़लीवूडचा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफनं एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्याला त्याच्या चाहत्यांचा मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. ज्यावेळी टायगरनं त्याचा शर्टलेस फोटो शेअर केला तेव्हा त्याला नेटक-यांनी लाईक्स आणि कमेंटस देऊन टायगरचे कौतूक केले. त्याच्या त्या फोटोवर त्याची गर्लफ्रेंड दिशा पटनानीही जाम खुश झाली आहे. तिनंही वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया त्याला दिली आहे. दिशानंही एकदम सॉलिड फोटो व्हायरल करुन चाहत्यांना धक्का दिला आहे. चाहत्यांना तिचा तो फोटो कमालीचा आवडला आहे. बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक फिट असणारी जोडी म्हणून टायगर आणि दिशाचे नाव घ्यावे लागेल. टायगर तर त्याच्या स्टंटबाजीसाठी प्रसिध्द आहे.

टायगरनं जो फोटो शेअर केला आहे त्यात तो विदाऊट टी शर्ट एका वेगळ्या पोझमध्ये उभा आहे. त्यानं मंगळवारी तो फोटो शेअर केला होता. त्याचा तो फोटो सर्वांच्या पसंतीस पडला होता. एका समुद्रकिनारी टायगर श्रॉफ उभा असल्याचे त्या फोटोमध्ये पाहायला मिळते. त्या फोटोला दिशानं आपला एक बोल्ड फोटो शेअर करुन कमेंटही केली आहे. टायगरनं सनग्लासच्या लूकमध्ये पोझ दिली आहे. त्यानं त्या फोटोला कॅप्शन देताना असं लिहिलं आहे,  काय म्हणालात... समुद्रकिनारा..., आतापर्यत त्याच्या त्या फोटोला 12 लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दिशानं लगेच टायगरला रिप्लाय म्हणून तिचा एक फोटो पाठवला आहे. त्यात ती भलतीच हॉट दिसते आहे. तिनंही टायगरच्या फोटोला कमेंट केली आहे. दोन फायरवाले इमोजी तिनं शेअर केले आहेत. टायगरच्या आगामी चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास त्याच्याकडे पुढील दोन वर्षांपर्यतचे प्रोजेक्टस् आहेत. हिरोपंती 2, बागी 4, रॅम्बो आणि गणपत सारखे चित्रपट तो करणार आहे. त्यात त्याचा अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT