evelyan.jpg 
मनोरंजन

'या' बॉलिवूड अभिनेत्रीने स्वीकारले प्रियकराचे प्रपोजल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बॉलिवूड चित्रपटांमध्ये काही लहान पण तितक्याच उल्लेखनीय आणि लक्षवेधी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने सोशल मीडिया पोस्टवरुन तिच्या आयुष्यातील काही सुरेख क्षण पुढे आणले आहेत. 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातून 'लारा' य़ा भूमिकेत झळकलेली ती अभिनेत्री आहे, एव्हलिन शर्मा. प्रियकराने आपल्याजवळ काही दिवसांपूर्वीच त्याच्या प्रेमाची कबुली दिली. त्याच्याच प्रेमाचा स्वीकार करत तिने या प्रपोजलला होकार दिला आहे. 

आपल्या जीवनातील हा सर्वोत्तम दिवस असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. ही आनंदाची बातमी जाहीर करत तिने काही फोटोही पोस्ट केले. ज्यामध्ये एव्हलिनचा प्रियकर डॉ. तुषान भिंडी गुडघ्यांवर बसून मोठ्या फिल्मी अंदाजात तिच्यावर असणारं प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. हे प्रपोजल फार खास होतं, यामागचं कारण म्हणजे त्या क्षणासाठी निवड करण्यात आलेलं ठिकाण. 

सि़डनीतील हार्बर ब्रिज येथे तुषान आणि एव्हलिन यांच्या नात्याला एक वेगळं आणि तितकंच सुखावह वळण मिळालं. 'टाईम्स ऑफ इंडिया'शी संवाद साधताना तिने आपला आनंद व्यक्त केला. 'तो क्षण जणू स्वप्नच सत्यात उतरत आहे.... अशी अनुभूती देणारा होता. तुषान मला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो. त्याची प्रपोज करण्याती पद्धतही सर्वोत्तम होती', असं म्हणत त्याने आपल्यासाठी एका गिटारिस्टची सोय केली होती. ज्याने त्या क्षणाला सारी आवडीची गाणी वाजवत चार चाँद लावल्याचंही ती म्हणाली. 

 अन् अशी झाली त्यांची भेट... 
तुषानसोबतची पहिली भेट कशी होती, याविषयी सांगत एव्हलिन म्हणाली, 'आम्ही एका ब्लाईंड डेटवर भेटलो होतो. मित्रमंडळींना तशी आखणी केली होती. मुळात तुषान हा माझ्याहूनही जास्त चित्रपटप्रेमी आहे.' य़ेत्या काळात आपण, लग्नाच्या तारखेची अधिकृत घोषणा करणार असल्याचंही ती म्हणाली. तूर्तास एव्हलिन आणि तिचा प्रियकर, तुषान हे दोघंही या गोड क्षणांचा आनंद घेत आहेत. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : पुढील ४८ तासांत होर्मुझ खुली केली नाही तर इराणचे पॉवर प्लॅंट नष्ट करु, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

Gold & Silver Prices: सोन्याच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी?

आजचे राशिभविष्य - 22 मार्च 2026

Sopara Buddhist Stupa : सोपारा बौद्ध स्तूप; इतिहासाच्या कुशीत लपलेलं महाराष्ट्राचं अनमोल ठेवं

मेष राशी साप्ताहिक राशिभविष्य (22 मार्च 2026 ते 28 मार्च 2026) - व्यवसायात तेजी, पण आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक

SCROLL FOR NEXT