Gauahar Khan and Zaid Darbar  Esakal
मनोरंजन

Gauahar Khan: वयाच्या चाळिशीत गौहर खान बनली आई! घरी नव्या पाहुण्याचे आगमन! फोटो व्हायरल

Vaishali Patil

'बिग बॉस 7' ची विजेती अभिनेत्री गौहर खान हिने छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाची अमिट छाप सोडली आहे. अभिनेत्री गौहर खानही गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नसीमुळे चर्चेत होती.

काही दिवसापुर्वीच गौहरच्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. आता बातमी येत आहे की या जोडप्याच्या घरी छोटा राजकुमार आला आहे.

(Gauahar Khan Blessed with Baby Boy)

होय, 10 मे रोजी गौहर खान आणि तिचा पती जैद दरबार यांच्या घरी एक छोटा पाहुणा आला आहे. गौहरने बुधवारी एका मुलाला जन्म दिला आहे.

गौहर खान आणि तिच्या पतीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

गौहर खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर आई झाल्याची माहिती दिली आहे. एक खास पोस्ट शेअर करत गौहर खानने लिहिले की, हो मुलगा झाला आहे. 10 मे 2023 रोजी आम्हाला खर आनंद म्हणजे काय हे कळालं आहे. आमचा मुलगा... त्याला दिलेले प्रेम आणि प्रार्थनेबद्दल सर्वांचे आभार....

जैद आणि गौहर नवीन आता आईबाबा बनल्याबद्दल त्याचा आनंद त्याच्या पोस्टमधुन कळत आहे. अशातच गौहर खानने आई झाल्याबद्दलच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत

गौहर खान बद्दल सांगायच झालं तर तिने 2020 मध्ये डिजिटल निर्माता जैद दरबारशी लग्न केले. जैद हा संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा आहे. गौहर आणि जैद यांच्या वयात ६-७ वर्षांचे अंतर आहे, पण त्यांची केमिस्ट्री अप्रतिम आहे.

जैद पहिल्या नजरेतच गौहरच्या प्रेमात पडला होता आणि काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज गौहर तिच्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी आहे. दोघेही अनेकदा त्यांच्या आनंदी आयुष्याची झलक सोशल मीडियावर शेअर करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT