Janhvi Kapoor
Janhvi Kapoor  
मनोरंजन

Janhvi Kapoor: हिंदी बोलता येईना, आईनं लेकीला भर परिषदेत झापलं

सकाळ डिजिटल टीम

Bollywood News: बॉलीवूडममध्ये आपल्या अभिनयानं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्रीमध्ये श्रीदेवीचं नाव घेतलं जातं. अल्पावधीतच (Bollywood Actress) त्यांनी एक्झिट घेतली. त्यांच्या जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यांच्या जाण्यानंतर त्यांची लेक जान्हवी कपूरनं (Janhvi Kapoor) बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटविण्याचे काम केले आहे. धडक चित्रपटातून तिनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. आज जान्हवीचा जन्मदिन त्यानिमित्तानं आपण तिच्याविषयीच्या खास आठवणींना उजाळा देणार आहोत.

श्रीदेवीनं तिच्या एका चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जान्हवीला सुनावले होते. जान्हवीला उपस्थित पत्रकारानं दोन शब्द हिंदीत बोलण्याची विनंती केली होती. तेव्हा जान्हवीनं अडखळत हिंदी बोलण्याचा प्रयत्न केला होता. तिनं आपण आताच शाळेत ही भाषा शिकायला सुरुवात केल्याचे तिने सांगितले होते. त्यामुळे आपण अजूनही त्या भाषेमध्ये तितकेसे सरावलेलो नाही. हे ऐकून श्रीदेवीला धक्काच बसला होता. तिनं तिला त्याठिकाणीच तुला जर हिंदीमध्ये काम करायचे असेल तर हिंदी शिकायला पाहिजे. या शब्दांत सुनावले होते. त्या प्रसंगाची बराचकाळ चर्चा होती.

आज जान्हवीनं वयाची 25 वर्षे पूर्ण केली आहेत. 2018 मध्ये तिनं धडकमधून बॉलीवूडमध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. गुंजननंतर तिच्या वाटयाला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आल्या. आणि त्यातून ती चाहत्यांसमोर आली आहे. श्रीदेवीची मोठी मुलगी म्हणून जान्हवीची ओळख होती. त्यानंतर आता तिनं ती बदलण्यास सुरुवात केली आहे. जान्हवी सध्याच्या घडीला सोशल मीड़ियावर चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. इंस्टावर देखील तिच्या फॉ़लोअर्सची संख्या मोठी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT