kangana ranaut esakal
मनोरंजन

मुस्लिम लोकसंख्येवर कंगनाची तिखट प्रतिक्रिया, म्हणाली...

काश्मीरमध्ये जे काही झालं ते आपण एका दिवसाची घटना म्हणून त्याकडे पाहणे चुकीचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood News: बॉलीवूडच्या वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी आता विवेक अग्निहोत्री (The kashmir Files) दिग्दर्शित द काश्मिर फाईल्स या चित्रपटावर वेगवेगळ्या (Bollywood Movies) प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावरुन एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Actress Kangana Ranaut) ही तिच्या वादग्रस्त भूमिकेसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर सतत (Social media news) वेगवेगळ्या भूमिका घेऊन ट्रोल झालेली कंगना आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिनं मुस्लिम लोकसंख्येवर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे तिच्यावर काही नेटकऱ्यांनी टीका केला आहे. कंगनाचा अंदाज हा नेहमीच तिखट स्वरुपाचा असतो. आपण म्हणतो तेच खरे, अशा आक्रमक पवित्र्यात कंगना अनेकदा तिची मतं दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करताना दिसते.

1990 मध्ये काश्मिरच्या खोऱ्यात काश्मिरी पंडितांच्याबाबत झालेल्या अन्याय अत्याचारावर विवेक अग्निहोत्री यांनी बोट ठेवले आहे. या चित्रपटामध्ये पल्लवी जोशी. चिन्मय मांडलेकर, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून काश्मिर फाईल्सनं मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही वेळापूर्वी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काश्मीर फाईल्स हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. याशिवाय आणखी काही राज्यांमध्ये देखील हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये काश्मिर फाईल्स टॅक्स फ्री करावा अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र अजुन त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही.

कंगनानं या चित्रपटाचं कौतूक केलं आहे. तिनं हा चित्रपट पाहिल्यावर एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये तिनं प्रेक्षकांना काश्मीर फाईल्स पाहण्याचे आवाहन केले आहे. त्या व्हिडिओमध्ये कंगनानं भारत आणि पाकिस्तानातील मुस्लिम लोकसंख्येवर प्रतिक्रिया दिली आहे. कंगना नेटकऱ्यांना सांगते, सर्वांना नमस्कार, काल रात्री मी माझ्या कुटूंबियांसमवेत द काश्मिरी फाईल्स नावाचा चित्रपट पाहिला. यासाठी सर्वात प्रथम मी विवेक अग्निहोत्री यांचे मनपूर्वक अभिनंदन करते. त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून देशाला खूप काही दिलं आहे.

या प्रतिक्रियेनंतर कंगनानं मुस्लिम लोकसंख्येविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणते, काश्मीरमध्ये जे काही झालं ते आपण एका दिवसाची घटना म्हणून त्याकडे पाहणे चुकीचे आहे. जेव्हा भारताचे विभाजन झाले आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. तेव्हा तिथे जेवढे हिंदू होते तेवढे आपल्याकडे मुस्लिम होते. आज जेव्हा मुस्लिमांची लोकसंख्या पाहते तेव्हा हिंदू केवळ नावालाच राहिले आहेत असे वाटते. त्याठिकाणी रोज हिंदूंना वेगवेगळ्या अन्याय, अत्याचाराला सामोरं जावं लागतं. असं कंगनानं लिहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT