kareena kapoor khan news esakal
मनोरंजन

Kareena Kapoor: 'प्रेग्नंसीच्या' बातमीवर करिनाचं मोठं वक्तव्य

बॉलीवूडची बेबो करिना पुन्हा एकदा गुड न्युज देण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या.

युगंधर ताजणे

Kareena Kapoor News: बॉलीवूडची बेबो करिना पुन्हा एकदा गुड न्युज देण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. त्यावरुन करिनावर (Bollywood Actress News) वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही समोर आल्या होत्या. यासगळ्यात करिनाची पुन्हा एकदा गोड बातमी कानावर आल्यानं तिच्या चाहत्यांना कमालीचा आनंदही झाला होता. यावर आता अभिनेत्री प्रतिक्रिया आली आहे. तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या प्रतिक्रियेवर आता वेगळ्याच (Entertainment news) चर्चेला उधाण आले आहे. करिना असं काय बोलली हे आपण जाणून घेणार आहोत.

आपल्या प्रेग्नंसीविषयी सोशल मीडियावर जे फोटो व्हायरल झाले आहेत ते पूर्वीचेच फोटो पुन्हा मॉर्फ करुन टाकल्याचे तिचे म्हणणे आहे. नेटकऱ्यांना मला ट्रोल करुन काय मिळते असा सवाल करिनानं केला आहे. करिनानं एका ट्रीपचा फोटो शेयर केला होता. त्यामध्ये तिनं पास्ता आणि वाईनचा आम्ही एकत्रित आनंद घेतो आहोत असे म्हटले होते. आता तोच फोटो ती प्रेग्नंट असल्याचे सांगत सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यावरुन करिनाला नेटकऱ्यांनी खरी गोष्ट काय आहे असा प्रश्न विचारला आहे. वाढत्या प्रतिक्रिया पाहून तिनं त्यावर उत्तर दिलं आहे.

एका मुलाखतीमध्ये करिनानं म्हटलं आहे की, तो फोटो पूर्णपणे मॉर्फ करण्यात आला आहे. चाळीस दिवसांपूर्वीचा तो फोटो एका पिझ्झा हटमधील आहे. सोळल मीडियावर चर्चा होण्यासाठी लोकं काय करतील याचा भरवसा नाही. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. मला अनेकदा यावरुन ट्रोल करण्यात आले आहे. कित्येकांना सांगुनही कळत नाही. त्यांना सेलिब्रेटींना नावं ठेवण्यात त्यांची मापं काढण्यात मजा येते. यासगळ्याचा परिणाम आमच्यावर काय होतो याविषयी मात्र ते विचार करत नाही. अशी खंत करिनानं यावेळी व्यक्त केली. आहे.

करिनाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तिचा आमीर सोबत लाल चढ्ढा सिंग नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या दोन वर्षापासून त्याची चर्चा सुरु होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case Exposes : चक्क ९ लाख रुपयांचा टर्किश मध! खरातचा फेमस प्रसाद कसा बनायचा ? तपासात उघड झाले धक्कादायक सत्य

Kolhapur jotiba : जोतिबा डोंगरावर कडकडीत बंद; पुजाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध; दर्शन मात्र सुरळीत

Latest Marathi News Live Update : सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई मिरगावमध्ये दाखल

Kolhapur Solapur Accident : तुळजापुरला जाताना काळाचा घाला, कोल्हापूर–सोलापूर रस्त्यावर भीषण अपघातात कसबा बावड्यातील दाम्पत्य ठार

फक्त 10,999 मध्ये खरेदी करा 50MP सेल्फी कॅमेरा; AI फीचर्स, iPhone सारखा जबरदस्त मोबाईल, 31 मार्चपर्यंत 14 हजारचा डिस्काउंट

SCROLL FOR NEXT