Bollywood Actress Karishma Kapoor News
Bollywood Actress Karishma Kapoor News esakal
मनोरंजन

Karishma Birthday: दोन अभिनेत्यांच्या होती प्रेमात, पण उद्योपतीशी केलं लग्न!

युगंधर ताजणे

Karishma Kapoor: बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर ही तिच्या अभिनयाबरोबरच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे. 90 च्या (Bollywood Actress Karishma Kapoor) दशकांत ज्या अभिनेत्रीनं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते त्या अभिनेत्रीनं मोठा चाहतावर्ग तयार केला. निर्माते आणि दिग्दर्शक यांनाही करिश्मा आपल्या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री असावी असं वाटायचं. एवढा त्या अभिनेत्रीचा प्रभाव होता. अनेक (bollywood celebrity news) कारणांमुळे करिश्मा ही चर्चेत आली होती. तिचं प्रेमप्रकरणं तर तिच्या चाहत्यांसाठी खास गॉसिपिंगचा विषय होता.

भलेही करिश्मा कपूरच्या मागे कपूर आडनावाचं वलय होतं तरी देखील त्या अभिनेत्रीनं स्वताच्या हिंमतीवर बॉलीवूडमध्ये मोठं स्थान मिळवलं होतं. 90 च्या दशकांतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून करिश्मा ही नेहमीच आघाडीवर होती. गोविंदा, अक्षय कुमार, सलमान खान, अजय देवगण, अभिषेक बच्चन, यासारख्या मोठ्या स्टारसोबत करिश्मानं काम केलं. यासगळ्यात तिचं अजय देवगण, अभिषेक बच्चन यांच्याबरोबरील तिचं प्रेमप्रकरण चर्चेत राहिलं.

अभिनेत्री करिश्मा कपूरनं उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न केलं. अनेकांना त्यावेळी असं वाटलं होतं की, करिश्मा ही एखाद्या स्टारसोबत लग्न करेल. मात्र तसे न झाल्यानं तिच्या चाहत्यांना कमालीचे वाईट वाटले होते. संजय कपूरपूर्वी तिचं नाव अजय देवगण आणि अभिषेक बच्चनसोबतही करिश्माचं प्रेमप्रकरण असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या होत्या. करिश्मा ही नेहमीच तिच्या बिनधास्तपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. सध्या ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ज्यावेळी रविनाचे नाव अजय देवगणशी जोडले जाऊ लागले त्यानंतर करिश्मा आणि अजयच्या रिलेशनशिपला तडा गेल्याचे बोलले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT