vicky, katrina vicky, katrina
मनोरंजन

विकी कतरिनाच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल?; चाहते कोड्यात

एवढी काळजी घेऊन सुद्धा लग्नाचा व्हिडिओ कसा व्हायरल झाला.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलीवूडमधील सर्वात चर्चेतील कपल म्हणून विकी आणि कतरिनाचे नाव घ्यावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. आता तर त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते गोंधळून गेले आहेत. त्याचे कारण विकी कतरिनाच्या लग्नाची तारीख अजून लांब आहे आणि त्यात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं त्यांना धक्का बसला आहे. काही वेळेपासून त्या व्हिडिओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचे दिसून आले आहे.

तो व्हिडिओ फिल्मीस्तान आणि फिल्मी किडा नावाच्या एका इंस्टाग्रामवरुन शेयर करण्यातल आला आहे. जसा तो व्हिडिओ व्हायरल झाला तसं त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्या व्हिडिओमध्ये जया बच्चन, अमिताभ बच्चनही दिसत आहे. जया बच्चन या कॅटरिनाची गळाभेट घेत आहे. कॅटरिनानं पतीचा हात पकडला आहे. मात्र अनेक चाहत्यांना ती व्यक्ती विकी कौशल वाटत नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे. काहींनी हा फेक व्हिडिओ असून तो त्यांच्या लग्नाचा नव्हे तर एका जाहिरातीचा असल्याचे सांगितले आहे.

एका युझर्सनं त्या व्हिडिओवर कमेंट केली आहे. त्यानं लिहिलं आहे की, अरे खरचं त्या लग्नाचा व्हिडिओ आहे की एखाद्या जाहिरातीचे शुटिंग सुरु आहे. दुसऱ्या युझर्सनं लिहिलं आहे....एवढी काळजी घेऊन सुद्धा लग्नाचा व्हिडिओ कसा व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून तो त्यांच्या लग्नाचा आहे यावर विश्वास काही केल्या बसत नाही. वास्तविक तो व्हिडिओ एका जाहिरातीचाच असून तो गेल्या काही वेळापासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो सध्या ट्रेडिंगचा विषय झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT