Bollywood actress Kiara Advani brings home a new Maybach S580 super luxury sedan worth Rs 2.70 crore sakal
मनोरंजन

Kiara Advani New Car: आपली दहा घरं येतील; कियारानं घेतली एवढी महागडी गाडी.. किंमत ऐकून..

बॉलीवुड अभिनेत्री कियारा अडवाणीच्या दारात नवी आलीशान गाडी..

नीलेश अडसूळ

Kiara Advani New Car: बॉलीवूडमध्ये आपल्या हटके स्टाईल आणि लूकसाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री म्हणजे कियारा अडवाणी , फार कमी वेळेत तिनं आपली वेगळी ओळख बॉलीवूडमध्ये तयार केली आहे.

सध्याच्या घड़ीला बॉलीवूडमधील टॉपची अभिनेत्री म्हणून तिनं चाहत्यांची पसंती मिळवली आहे. काही दिवसांपूर्वी तिचे 'भुलभुलैय्या 2 ', 'जुग जुग जिओ' हे चित्रपट प्रदर्शित झाले होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

काही दिवसांपूर्वीच ती लग्नबंधनात अडकली होती आणि आता कियाराने एक मोठी आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.

(Bollywood actress Kiara Advani brings home a new Maybach S580 super luxury sedan worth Rs 2.70 crore)

कियारा अडवाणी काही दिवसांपूर्वीच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सोबत लग्नबंधनात अकडली. लवकरच ते 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटातून झळकणार आहेत. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे.

अशातच कियाराने स्वत:साठी एक मगागडी आणि आलिशान गाडी खरेदी केली आहे. तिनं काळ्या रंगाची मर्सडीज घेतली आहे. कियाराने खरेदी केलेल्या Mercedes Maybach S580 ची किंमत अंदाजे 2.70 ते 3.70 कोटी इतकी आहे. म्हणजे अंदाजे 3 कोटींची ही गाडी आहे. या गाडीची किंमत ऐकून अनेकांचे डोळे फिरले आहेत.

कियारा आडवाणी (Kiara Advani आणि कार्तिक आर्यनचा 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून कियारा आणि कार्तिक दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. याआधी त्यांनी 'भूल भूलैया 2' या सिनेमातही एकत्र काम केले होते.

तसेच दाक्षिणात्य अभिनेता राम चरणसोबत ती 'गेम चेंजर' या सिनेमात दिसणार आहे. याआधीदेखील तिने राम चरणसोबत काम केलं होतं. 2019 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'विनय विद्या राम' या सिनेमात ती राम चरणसोबत दिसली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT