kiara advani
kiara advani 
मनोरंजन

आमिरला कोरोनाची लागण झाल्यानं अभिनेत्रीला टेन्शन; दुसऱ्यांदा केली टेस्ट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलिवूडमध्ये सध्या कोरोनामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शूटिंगच्या सेटवर कलाकार आणि त्यांची टिम योग्य ती काळजी घेत आहे. पण काही कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचं पहायला मिळतंय. बॉलिवूडमध्ये 'मिस्टर परफेक्टशनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अमिर खानला नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे. आमिर सध्या होम क्वारंटाईन आहे.  त्यामुळे काही दिवसांपूर्वी  त्याच्या  संपर्कात आलेल्या काही कलाकार आणि तांत्रिक विभागतील टिममधील लोकांना धडकी भरली आहे. 

आमिर खान कोरोनाची लागण होण्याआधी एका जाहिरातीचे चित्रीकरण करत होता. या जाहिरातीत त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणी देखील काम करत होती. आमिरला कोरोनाची लागण झाल्याने तिला कोरोनची टेस्ट करावी लागली. तसेच कियारासोबतच दिग्दर्शक नितेश तिवारीला देखील टेस्ट करावी लागली आहे.

याआधी देखील कियाराला कोरोनाची टेस्ट करावी लागली होती. त्यावेळी ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत 'भूल भूलैय्या-2' या चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. कार्तिकला देखील कोरोनाची लागण झाली आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिध्द कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. 'जूग जूग जियो' या चित्रपटातील कलाकार नितू कपूर आणि वरूण धवन यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. कियारा लवकरच भूल भुलैय्या-2, शेरशाह, जुग जुग जियो या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : ‘पीओके’ भारताचेच, आम्ही ते घेऊ ;अमित शहा

आजचे राशिभविष्य - 17 मे 2024

Latest Marathi News Live Update : महायुतीची शिवाजी पार्कवर तर, इंडिया आघाडीची बीकेसी मैदानावर आज सांगता सभा

पुण्याचा चालता-बोलता इतिहास

Loksabha Election : पहिल्या चार टप्प्यांत ६६.९५ टक्के मतदान ; अधिकाधिक मतदानाचे आयोगाचे आवाहन

SCROLL FOR NEXT