Bollywood Actress Madhuri Dixit Nene buy New Porsche 911 Turbo S car Worth Rs 3.08 Crores sakal
मनोरंजन

Madhuri dixit: अभिनेत्री माधुरी दीक्षितनं खरेदी केली 'ही' सुपर कार.. किंमत ऐकून फुटेल घाम..

कोट्यावधी रुपये खर्च करून माधुरीने स्वत:ला भेट दिली सुपरकार..

नीलेश अडसूळ

Madhuri dixit new car: बॉलीवुड मधील एक दिग्गज अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. बॉलीवुडमधला मराठी आवज म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक काळ असा होता की माधुरी दीक्षित साठी चाहते वेडे होते. आजही ती क्रेझ कमी झालेली नाही.

माधुरी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील असं नाव आहे, जिचे सौंदर्य, स्टाईल, अभिनय आणि नृत्य आजही वाखाणले जाते. जवळपास 40 वर्षांच्या कारकिर्दीत माधुरीने 70 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आजही माधुरी दीक्षित हे नाव चर्चेत आहे. कधी रियालिटी शोच्या जज म्हणून तर कधी एखाद्या वेब सिरिज मधून त्या आपल्याला भेटत असतात. आज आज चर्चा आहे ती त्यांच्या नव्या गाडीची..

(Bollywood Actress Madhuri Dixit Nene buy New Porsche 911 Turbo S car Worth Rs 3.08 Crores)

नखरेल अदांनी चाहत्यांना भुरळ पाडणाऱ्या धक धक गर्ल माधुरी दीक्षित यांनी नवी कोरी सुपर कार खरेदी केली आहे. त्यांनी एक आलीशान गाडी स्वतःला भेट म्हणून दिली आहे. पोर्शे ९११ टर्बो एस असे या गाडीचे नाव आहे.

नुकतेच माधुरी दीक्षित व तिचा पती डॉ. नेने यांना या गाडीतून फिरताना स्पॉट करण्यात आले आहे. माधुरीने खरेदी केलेल्या पोर्शे या स्पोर्ट कारची किंमत तब्बल ३.८ कोटींच्या आसपास आहे. पोर्शे ही सगळ्यात जलद गतीने धावणाऱ्या गाड्यांपैकी एक आहे.

या गाडीचा रंग सिल्व्हर आहे. वेग प्रतितास ३३० किलोमीटर इतका आहे. या कारमध्ये ३.८ लिटरचे सहा पेट्रोल इंजिन सिलेंडर आहेत. ज्यामध्ये ६४१ बीएचपी पावर निर्माण करण्याची क्षमता आहे. २.६ सेकंदात ही कार १०० किलोमीटरचा वेग पकडते. बॉलीवूडमधील ही सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित पन्नाशीतही प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT