rakhi sawant news esakal
मनोरंजन

Rakhi Sawant Miscarriage: आई होण्याचं राखीचं स्वप्न भंगल

Vaishali Patil

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. तिनं प्रियकर आदिल खान दुर्रानीसोबत लग्नाचा व्हिडिओ शेअर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यातच आदिलनेही तिच्यासोबत लग्नास होकार देण्यासाठी वेळ लावला. त्या दरम्यान राखीनं मिडियासमोर खुप राडा केला. त्यानंतर आदिलनं लग्नाला होकार दिला.

त्यातच आता तिने मोठा धक्कादायक खुलासा केला आहे. ती गर्भवती होती, पण तिचा गर्भपात झाला होता. असं राखीचं म्हणनं आहे. तिने 'बिग बॉस मराठी सीझन 4' मध्ये देखील याचा उल्लेख केला होता, परंतु कोणीही ते गांभीर्याने घेतले नाही.असंही ती म्हणाली.

विरल भयानी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले आहे की राखीने त्याच्याशी झालेल्या संभाषणात तिचा गर्भपात झाल्याचं सांगितलं आहे.

यासंभाषणात राखी म्हणाली, "हो भावा, मी प्रेग्नंट होते आणि मी बिग बॉस मराठी शोमध्येही याची घोषणा केली होती, पण सगळ्यांनाच हा विनोद वाटला आणि कोणीही ते गांभीर्यानं घेतले नाही." राखीने तिचा गर्भपातही झाल्याचं सांगितलं होते.

राखी सांवत प्रेग्नंट झाल्याचा अंदाज लोकांनी लावला होता. तिने त्यामुळेच तिच्या लग्नाची घोषणा केली होती असं नेटकऱ्यांच म्हणणं होतं. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत प्रेग्नंट असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. राखीने अनेक मुलाखतींमध्ये तिच्या प्रेग्नेंसीबद्दल बोलण्यास नकार दिला मात्र, आता राखी सावंतच्या या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटना! ६० तासानंतरही ८ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा आक्रोश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आयुक्तांनी काय सांगितलं?

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित; महसूल विभागात गैरप्रकार, मंत्री बावनकुळेंची माहिती

Kaygaon News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनीच उचलला तणनाशकाचा पंप; विद्यार्थी सुरक्षा आणि आरोग्याच्या काळजीसाठी पुढाकार

Mohol News : मोहोळ येथे पंचायत समिती प्रशासन व नगरपरिषद प्रशासनात मोठा संघर्ष, नवीन नगरपरिषद इमारत बांधकामाचा पेटला वाद

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

SCROLL FOR NEXT