मनोरंजन

'खूप काही सहन केलं आतापर्यत, जर बोलली तर'...

आपल्या आगळ्या वेगळ्या अदाकारीनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणून रविना टंडनचे नाव घ्यावे लागेल.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - आपल्या आगळ्या वेगळ्या अदाकारीनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणून रविना टंडनचे नाव घ्यावे लागेल. रविना ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. शाहरुखच्या मुलाला आर्यनला जेव्हा एनसीबीनं अटक केली होती. तेव्हा आर्यनला पाठींबा देण्यात रवीनानं पुढाकार घेतला आहे. आता ती तिच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्याचे नाव आरण्यक असे आहे. त्यानिमित्तानं साधलेल्या संवादात आपल्या संघर्षमय प्रवासाबद्दल रवीनानं सांगितलं आहे. आरण्यकमध्ये तिनं कस्तुरी डोंगरा नावाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. बॉलीवूडमध्ये काम करताना आपल्याला ज्या वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं त्याविषयी रविनानं यावेळी माहिती दिली आहे.

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये रविनानं सांगितलं की, मला आतापर्यत इंडस्ट्रीमध्ये फार वेगळ्या प्रकारची माणसं भेटली. त्यांच्याकडून खूप त्रास झाला. प्रत्येकाचा स्वभाव ओळखणं, त्यानुसार त्याच्याशी वागणं हे दरवेळी शक्य होत असं नाही. तेव्हा खूप मानसिक त्रास होतो. आपण इतरांशी कितीही चांगलं वागलं तरी देखील आपण त्यांच्यादृष्टीनं वाईटच असतो. हा अनुभव मला मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करताना आला आहे. कुणाचे नाव घेऊन वाद निर्माण करणं हे काही स्वभावात नाही. मात्र कुणी जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते सहन करणार नाही. अद्याप मी काहीही बोलले नाही.

मला आतापर्यत अशा काही व्यक्ती भेटल्या आहेत ज्या समोर एक आणि पाठीमागे वेगळ्या प्रकारे वागतात. मला एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडला तर मी त्या व्यक्तीला आपलं मानते. मात्र इंडस्ट्रीमध्ये चित्र फार वेगळे आहे. त्याचा अनुभव घेतला आहे. आपण जसे आहोत तसं जग नाही. हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे कुणाला किती महत्व द्यायचे हे देखील आपल्याला समजायला हवे. जगण्यासाठी आपण दुसऱ्यांशी किती प्रामाणिक आहोत ही भावना महत्वाची आहे. असेही रवीनानं यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT