Shabana Azmi  esakal
मनोरंजन

Shabana Azmi: 'मुस्लिम नसते तर...' कोणत्या अभिनेत्यासोबत झालं असतं लग्न?

बॉलीवूडमध्ये ज्या अभिनेत्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या हदयावर अधिराज्य केले त्यात संजीव कुमार यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

युगंधर ताजणे

Sanjeev Kumar Biography: बॉलीवूडमध्ये ज्या अभिनेत्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या हदयावर अधिराज्य केले त्यात संजीव कुमार यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. जबरदस्त प्रभाव त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर होता. (Bollywood News) चेहऱ्यावरील हावभाव, संवादफेक यांच्या जोरावर संजीव कुमार यांनी त्यावेळच्या तरुणांना आपलेसं केलं होतं. 80 च्या दशकांत संजीव कुमार यांच्या चित्रपटांना मिळालेला प्रतिसादही मोठा होता. त्यांच्या 84 व्या (Bollywood movies) जयंतीच्या निमित्तानं 9 जुलै रोजी एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

संजीव कुमार यांच्या जयंतीनिमित्तानं पार पडलेल्या त्या कार्यक्रमामध्ये एक किस्सा सांगण्यात आला. तो सध्या व्हायरल झाला आहे. संजीव कुमार यांच्या (Entertainment News) चरित्र ग्रंथाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. ती बायोग्राफी रीता राममुर्ती गुप्ता आणि संजीव यांचा भाचा उदय जरीवाला यांनी लिहिली आहे. संजीव यांच्या आयुष्यात अनेक प्रेमप्रकरणं झाली. मात्र पूर्णत्वाला एकही गेलं नाही. त्यात प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांच्या नावाचा उल्लेखही असल्याचे सांगण्यात आले आहे.

संजीव कुमार यांच्या चरित्र ग्रंथाचे नुकतेच प्रकाशन झाले. यावेळी त्यांनी त्या पुस्तकातील काही प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पुस्तकामध्ये शबाना आझमी आणि संजीव कुमार यांच्याविषयीचे काही उल्लेख आहेत. त्यात असे म्हटले आहे की, जर संजीव यांच्या आईनं विरोध केला नसता तर शबाना आझमी आणि संजीव कुमार यांचे लग्न झाले असते. त्यांच्या आईचा त्या लग्नाला सक्त विरोध होता. असा उल्लेख संजीव कुमार यांनी 1979 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीतून घेतला आहे.

संजीव कुमार यांनी सांगितलं होतं की, मी शबानाला फिल्म लाईनमध्ये येण्यापूर्वीपासून ओळखत होतो. मी त्यांच्या मातोश्री शौकत यांच्यासोबतही रंगभूमीवर काम केले होते. त्यावेळेपासून मी शबानाला ओळखत होतो. तेव्हा भलेही तिच्याप्रती माझ्या मनात असलेले प्रेम हे अल्लड असेल. मात्र त्या आठवणी फार गोड होत्या. आमचं लग्न झालं असतं. मात्र माझ्या आईला मुस्लिम मुलगी नको होती. मी जर शबानाशी लग्न केलं असतं तर मला माझं घर सोडावं लागलं असतं. आणि मला ते करायचं नव्हतं. असा खुलासा संजीव यांनी यावेळी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT