sonakshi sinha
sonakshi sinha  
मनोरंजन

लग्न केव्हा ? सोनाक्षीनं दिलं जशास तसं उत्तर....

सकाळ डिजिटल टीम

Bollywood Actress Sonakshi Sinha: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही जशी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते तशीच ती तिच्या बोल्डनेस आणि आक्रमकपणासाठी चर्चेत असते. हल्ली फॅन्स आपल्या आवडीच्या सेलिब्रेटींना (Bollywood News) वेगवेगळे प्रश्न विचारुन त्रास देत असल्याचं दिसून आलं होतं. सोनाक्षीही त्याला काही अपवाद नाही. यापूर्वी तिला अशा प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. तिच्या लग्नावरुन अनेकदा तिला ट्रोलही करण्यात आले होते. आताही तिला एका फॅन्सनं लग्न कधी असा प्रश्न विचारला, त्यावर त्या नेटकऱ्याला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याचं धाडसं सोनाक्षीनं दाखवलं आहे. (Bollywood Actress Sonakshi Sinha Answer When she married)

त्या नेटकऱ्यानं सोनाक्षीला विचारलं सध्या तर ओमीक्रॉनचा (Omicron) प्रभाव वाढतोय अशावेळी आपण काय करत आहात, त्यावर सोनाक्षीनं सांगितलं की, मी आता मार्वलच्या चित्रपटांचा आनंद घेत आहे. माझी चित्रपट पाहण्याची यादी पूर्ण झाली आहे. वेळ आहे तर त्या मुव्हिज मी पाहून घेणार आहे. याशिवाय आणखी कुठला माझा प्लॅन नाही. त्यावर एका युझर्सनं तिच्या फॅशनविषयी तिला प्रश्न विचारला तेव्हा सोनाक्षीनं आपला एक फोटो शेयर करुन त्याला उत्तर दिलं. यासगळ्यात एका खोडसाळ नेटकऱ्यानं सोनाक्षीला तु आता लग्न केव्हा करणार या प्रश्नाचं उत्तर दे....असं विचारलं.

सोनाक्षीनं त्याला जे उत्तर दिलं त्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. सोनाक्षीनं तिच्या अंदाजात त्याला उत्तर दिलं. ती त्याला म्हणाली, आता सध्या प्रत्येकाला कोरोना होत आहे याचा अर्थ तो मलापण व्हायला हवा का? सोनाक्षीनं दिलेल्या या उत्तरानं त्या नेटकऱ्याची बोलीतीच बंद झाली आहे. येत्या काळामध्ये सोनाक्षीचे मोठे प्रोजेक्ट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. गेल्यावेळी ती अजय देवगणच्या भुज द प्राईड या चित्रपटामध्ये दिसली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT