bollywood actress trupti dimri with kartik aaryan in aashiqui 3 after animal SAKAL
मनोरंजन

Tripti Dimri: 'अ‍ॅनिमल'च्या यशानंतर चमकलं 'भाभी 2'चं नशीब! कार्तिक आर्यनसोबत या बिग बजेट सिनेमात झळकणार

अ‍ॅनिमल'नंतर तृप्तीला कार्तिक आर्यनसोबत मोठा प्रोजेक्ट मिळालाय

Devendra Jadhav

Trupti Dimri News: 'अ‍ॅनिमल' सिनेमा रिलीज झाला आणि सिनेमातील रश्मिका मंदानापेक्षा जास्त चर्चा झाली ती भाभी 2 म्हणजेच अभिनेत्री तृप्ती डिमरीची.

सध्या तृप्ती तिच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. आता तृप्ती आणि तिच्या चाहत्यांसाठी एक खास बातमी समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, तृप्ती लवकरच हँडसम हंक अभिनेता कार्तिक आर्यनसोबत बिग बजेट सिनेमात रोमान्स करताना दिसणार आहे. हा सिनेमा कोणता? जाणून घ्या.

तृप्ती - कार्तिकच्या सिनेमाची उत्सुकता

कार्तिक आर्यन लवकरच त्याच्या मोस्ट अवेटेड 'आशिकी 3' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. आता या चित्रपटात तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची बातमी समोर येत आहे. (Trupti - Karthik's movie curiosity)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही जोडी आता चित्रपटासाठी निश्चित झाली आहे. ही बातमी समजल्यानंतर केवळ कार्तिकच नाही तर तृप्तीचे चाहतेही आनंदात आहेत.

'आशिकी 3'साठी तृप्ती डिमरीच!

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यन आता तारा सुतारियासोबत नाही तर 'आशिकी 3' मध्ये तृप्ती डिमरीसोबत दिसणार आहे. आशिकी फ्रँचायझीचा हा तिसरा चित्रपट आहे. जिथे राहुल रॉय आणि अनु अग्रवाल 'आशिकी'मध्ये दिसले होते. तर 'आशिकी 2' मध्ये आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी आपल्या सिझलिंग केमिस्ट्रीने चाहत्यांना वेड लावले होते. आता अनुराग बासू 'आशिकी 3' चं दिग्दर्शन करणार आहे. (Thripti Dimri for Aashiqui 3!)

'आशिकी 3'चे शूटिंग कधी सुरू होणार?

तृप्ती डिमरीबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री अलीकडेच संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटात रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसली होती. या चित्रपटातील दोघांच्या इंटिमेट सीनची बरीच चर्चा झाली होती. (When will the shooting of 'Aashiqui 3' start?)

या चित्रपटातून तृप्तीने सर्वांच्या मनावर राज्य केलं. अनुराग बासू दिग्दर्शित 'आशिकी 3' च्या शूटिंगला 2024 मध्ये सुरूवात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

TCS प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना! तुळशी माळ काढून महिलेला दारू-सिगारेट पाजली; नंतर धमकी देत धर्मांतर अन् अत्याचार

आयुष्यात काही तरी कमी पडतंय... मराठमोळ्या अभिनेत्रीची इंस्टापोस्ट व्हायरल, मोठा निर्णय घेत म्हणाली-

RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वाघांची 'शेळी' झाली! दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट गोलंदाजी केली; दोनशेपार जाणारा संघ ढेपाळला

Latest Marathi News Live Update: अधिसेविकेकडून महिला कर्मचाऱ्याला कथित मारहाण; धुळे जिल्हा रुग्णालयात नर्सकडून आंदोलन

SCROLL FOR NEXT