akshay kumar 
मनोरंजन

अक्षय कुमारनं भर पार्टीत ट्विंकलला सांगितलं... तिलाही बसला धक्का

बॉलीवूडमध्ये (bollywood) अक्षय कुमारनं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये (bollywood) अक्षय कुमारनं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली. सध्याच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय असणारा अभिनेता म्हणून अक्षय कुमारचे (akshay kumar) नाव घ्यावे लागेल. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना देखील बॉक्स ऑफिसवर यश मिळाल्याचे दिसून आले आहे. आनंद एल राय दिग्दर्शित अतरंगी रे हा अक्षयचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट. त्यामध्ये साऊथचा सुपरस्टार धनुष आणि बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आज ट्विंकलला खन्नाचा (twinkle khanna) वाढदिवस आहे.

अक्षयनं बॉलीवूडचे कोणेएकेकाळचे सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या मुलीसोबत लग्न केले. ट्विंकलला खन्ना आणि अक्षय कुमार हे दोघेही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे सेलिब्रेटी आहेत. केवळ अभिनय नाही तर सामाजिक कामांमध्य़े देखील दोघांचा सहभाग आहे. अक्षयचा एका पार्टीमध्ये घडलेला किस्सा हा नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्यामध्ये त्यानं आपल्या पत्नीला जे सांगितल होतं त्यामुळे तिलाही मोठा धक्का बसला होता. वास्तविक त्या कार्यक्रमामध्ये अक्षय रॅम्प वॉक करत होता. तो एका जीन्स पँटची जाहिरात करत होता. हे करत असताना आणि त्यानं व्टिंकल खन्नाला एक लज्जास्पद कृती करण्यास सांगितली. त्यामुळे व्टिंकलला देखील ओशाळल्यासारखे झाले होते.

2009 मध्ये लॅक्मेच्या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली होती. (Twinkle Khanna Unbuttoned Akshay Kumar jeans) मात्र तो प्रसंग नेहमी अक्षयच्याबाबत सांगितला जातो. पँटचे बटन काढण्यासाठी त्यानं व्टिंकलला विचारणा केली होती. त्यामुळे काही वेळ व्टिंकलला धक्का बसला होता. या प्रसंगाचे फोटोही तेव्हा व्हायरल झाले होते. त्यानंतर अक्षयवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल (Trolled) देखील केले होते. घरातून देखील त्याला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT